You are currently viewing कोव्हिशिल्ड लसीची खासगी किंमत १००० रुपये..

कोव्हिशिल्ड लसीची खासगी किंमत १००० रुपये..

औषध महानियंत्रकांनी सीरम संस्थेने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड लसीची खासगी किंमत १००० रुपये असून, बुस्टर डोससह २००० असणार, असा खुलासा आज सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी केला आहे. औषध महानियंत्रकांनी सीरम संस्थेने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास रविवारी परवानगी दिली. यामुळे आता सर्वांच्या नजरा लसीकरण मोहीम कधी सुरु होणार याकडे लागल्या आहेत. दरम्यान कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचीही चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे.

जे काही आम्ही सरकारला देणार आहोत ते लोकांना मोफत दिले जाणार आहे. तर जेव्हा आम्ही खासगी मार्केटमध्ये याची विक्री करु तेव्हा प्रत्येक डोसची किंमत १००० रुपये इतकी असेल, असे अदर पुनावाला यांनी सांगितले. लसला बूस्टर डोसची आवश्यकता असल्याने याची एकूण किंमत २००० असेल. सीरमकडे आता पाच कोटी कोरोना लसीचे डोस उपलब्ध आहेत. अदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील सात ते दहा दिवसांत सर्व औपचारिकता पूर्ण होतील आणि आम्ही एका महिन्यात सात ते आठ कोटी लसींची पुरवठा करण्यासाठी निर्मिती करु.

पुढे त्यांनी सांगितले की, आम्ही कोरोना लसीची निर्यात किंवा खासगी मार्केटमध्ये विक्री करु शकत नाही. केंद्र सरकारने आम्हाला तसे सांगितले असून, आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करावी लागणार आहे. अनेक महत्वाच्या लोकांना लस देणे त्यांचे प्राधान्य असून, आम्हीदेखील त्यांच्या निर्णयाचा आदर करतो.

*किंमतीत होतील बदल*

केंद्र सरकारने रिटेलमध्ये विक्री करण्यास परवानगी दिली तर कोरोनाची लस १००० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तर दुसरीकडे सरकारला आपण हीच लस २०० रुपयांमध्ये देत असल्याचेही, त्यांनी सांगितले आहे. सीरम केंद्र सरकारला १० कोटी कोरोना लसीचे डोस देणार आहे. केंद्र सरकारला प्रत्येक डोससाठी २०० रुपये मोजावे लागणार आहेत. यानंतर टेंडर काढले जातील आणि किंमतीतही बदल होतील, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − five =