You are currently viewing “माझी लाडकी बहीण योजनेला” मिळणाऱ्या प्रतिसादा मुळे विरोधकांमध्ये पोटशूळ ; आमदार नितेश राणे

“माझी लाडकी बहीण योजनेला” मिळणाऱ्या प्रतिसादा मुळे विरोधकांमध्ये पोटशूळ ; आमदार नितेश राणे

“माझी लाडकी बहीण योजनेला” मिळणाऱ्या प्रतिसादा मुळे विरोधकांमध्ये पोटशूळ ; आमदार नितेश राणे

*जेव्हा महा विकास आघाडीची सत्ता येईल तेव्हा लाडकी बहीण योजना बंद करणार म्हणणारे संजय राऊत महिला विरोधी

*राज्यात माता भगिनींची आर्थिक उन्नती होत असेल तर ठाकरे,पटोले,शरद पवारांच्या पक्षाला नको असते

*त्याचेच प्रतिबिंब संजय राजाराम राऊत यांच्या पत्रकार परिषदेतून दिसले

कणकवली;
उबाठा पक्षाचे संजय राऊत यांनी जेव्हा आपले महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल तेव्हा “माझी लाडकी बहीण योजना” बंद करू असे केलेले वक्तव्य राज्यातील महिला भगिनींनी काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करू पाहत आहे मात्र या राज्यात चुकून जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर ही योजना बंद करण्याची मानसिकता महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांची आहे. तेच संजय राऊत हे स्पष्ट शब्दात बोलले आहेत. राज्यात काही चांगले होत असेल, आर्थिक उन्नती होत असेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना ते बघवत नाही. त्यांना पोटशूळ उठतो आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेवर टीका केली जात आहे. याचा विचार जनतेने व माता-भगिनींनी करावा असे आवाहन भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केले.
महाराष्ट्रात आमच्या महायुती सरकारने “माझी लाडकी बहीण योजना” ही माता-भगिनींच्या आर्थिक उन्नती साठी आणलेली अतिशय महत्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना अमलात आणल्यानंतर विरोधकांमध्ये पोटशूळ निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांचा उबाठा पक्ष, नाना पटोले यांचा काँग्रेस,शरद पवारांची राष्ट्रवादी असे सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. आता तर उबाठा चे संजय राऊत यांनी जेव्हा कधी जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल त्यावेळी “माझी लाडकी बहीण योजना” बंद करणार अशी घोषणाच केलेली आहे.यातूनच महाविकास आघाडीचे नेते आणि पक्षाची मानसिकता दिसून येते.राज्यातील माता-भगिनी या महाविकास आघाडीच्या अशा वृत्तीचा निश्चितपणे काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतील असा विश्वास भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला.
कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी आयोजित इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर सरकार विरोधी महविकासा आघाडीतील पक्षांची या योजनेवर होणारी टीका ही सर्वसामान्य महिलांच्या विकासावर आणि उन्नतीला रोखणारी असल्याचे दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील जनतेचे चांगले होत असेल, माता-भगिनींची आर्थिक उन्नती होत असेल तर ही गोष्ट या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पहावत नाही. आणि म्हणूनच अशा पद्धतीची वक्तव्य ते करत असल्याचीही टीका नितेश राणे यांनी केली.
भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून बेइमानी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले सत्ता स्थापन करू शकले अशा लोकांनी प्रेमाने ची भाषा बोलू नये स्वतःची लायकी पहावी आणि नंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करावी. 145 आमदार जेव्हा उद्धव ठाकरेंनी निवडून आणले होते तेव्हा ते स्वतःच्या ताकदीवर आणले होते का ? कालच्या लोकसभेत 21 जागा लढवल्या आणि फक्त नऊ जागा मिळवल्या यातूनच तुमचा स्ट्राईक रेट काय आहे हे जनतेला कळले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी लायकीप्रमाणे बोलावे अशा शब्दात सुनावले.
राज साहेब यांनी शिवाजी पार्क येथे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे भाषण केले होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण बिनशर्थ पाठिंबा दिला होता. आता त्यांनी आपल्या पक्षासाठी भूमिका घेतलेली आहे.
संजय राऊत यांनी दुसऱ्याला डबल ढोलकी बोलण्यापेक्षा 2019 मध्ये स्वतःच्या पक्षाची हिंदुत्वाबद्दलची भूमिका काय होती आणि त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने बिस्कीट फेकल्यानंतर आता तुमची भूमिका काय आहे. कधी हिंदुत्वाचे बाजूने कधी हिंदुत्वाच्या विरोधात काम करायचे ह्या डबल ढोलकी बद्दल कधीतरी संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडावी.
महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काय मिळालं हे “ढ” विद्यार्थ्याला कळणार नाही. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पहावी. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते तेव्हा विरोधी पक्षाचे सत्यनारायण घातले काय ? कोणत्या नेत्याचे कॉल रेकॉर्ड करण्यासाठी मातोश्रीच्या कोणत्या मजल्यावर कुठची वहिनी बसून असायची हॅकरला कसे पैसे पुरवायची याची माहिती आम्ही द्यायची का असा सवाल आहे यावेळी नितेश राणे यांनी केला. तर संजय राऊत यांच्या नॉन बायोलॉजिकल गोष्टी समोर आणल्या तर त्यांना घरातूनच आधी चप्पलचे मार मिळतील अशी टीका यावेळी एका प्रश्नावर उत्तर देताना केली.
बॉक्स
* जरांगे पाटील यांनी पवार साहेबांना जाब विचारण्याची हिंमत दाखवावी*
भारतीय जनता पार्टी, शिंदेची शिवसेना, अजित दादांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा आमच्या महायुती च्या सर्व पक्षांचे मराठा आरक्षणाबद्दल पहिल्या दिवसापासून स्पष्ट भूमिका आहे.मात्र मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षांची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. राज्यातील प्रत्येक पक्षाने आपली भूमिका जाहीर करावी हे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत.राज्य सरकार मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक आहे मात्र नाना पटोले आणि त्यांचा काँग्रेस पक्ष,उद्धव ठाकरे आणि त्यांचा उबाठा पक्ष,शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष यांना मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचे आहे की ओबीसी तून मराठा आरक्षण द्यायचे आहे ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सर्व पक्ष बैठकीला हे लोक येत नसतील आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडत नसतील तर राज्याला आणि मराठा समाजाला यांची भूमिका कळली पाहिजे. तसा जाब विचारण्याची हिंमत मनोज जरांगे पाटील यांनी दाखवली पाहिजे. असे आव्हान यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिले.
महाविकास आघाडीचा प्रत्येक खासदार लोकसभेत स्वतंत्र मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत आहे. पवार साहेब यांचे जुने व्हिडिओ पाहिले असता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या. असे अनेक व्हिडिओ आहेत. मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे जरांगे पाटील यांनी पवार साहेबांना भूमिका स्पष्ट करण्यासाठी जाब विचारण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान यावेळी नितेश राणे यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा