*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“माऊलींचे भजन”*
ज्ञानोबा सांगती नित्य करावे भजन
ध्येयाकडे वाटचाल करावी सश्रद्धेनंIIधृII
संतांवर सत्यावर असावी श्रद्धा पूर्ण
हृदय विशाल होते येते व्यापकपणं
शरीर सुखावे तृप्ती येते स्थिरावते मनंII1II
स्वतःला सोडवावे असत्य भ्रांतीपासून
दुःख येते चुकीला योग्य मानण्यांतून
भ्रांतीचा मन मळ धुवावा गुरु वाक्यानंII2II
भ्रांतीतून मुक्त होण्याचा मार्ग आहे ज्ञान
संत सत्संगांतून मिळते प्रसाद रूपानं
सत्य आवडू लागते निर्भय बनते मनII3II
माऊलींना संतांना काव्य येत शरण
शब्दावर आरूढ आतुर होत सिद्धांत
अक्षर शब्दांचे रूप घेती मनाप्रमाणंII4II
शास्त्र शब्द असती दासी सम आधीनं
मनाचा व्यापकपणा जपावा आदरानं
विश्वचि माझे घर माऊलींची शिकवणII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.