_*वीज ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी एकजुट दाखवावी : जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर*_
_तेरवण-मेढे, भेडशी येथे वीजग्राहक संघटनेची बैठक_
दोडामार्ग :
वीज ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी लढा देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली सर्वांची एकजुट आवश्यक आहे. एकटा ग्राहक अन्याय सहन करत राहतो माञ संघटन असेल तर न्याय नक्की मिळेल त्यासाठी आपल्या हक्कासाठी एकजुट आवश्यक आहे असे प्रतिपादन वीजग्राहक संघटना व जिल्हा व्यापारी संघ समन्वयक अॅड.नंदन वेंगुर्लेकर यांनी तेरवण-मेढे, भेडशी येथे आयोजित केलेल्या बैठकीत केले.
वीज ग्राहक संघटना व जिल्हा व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तेरवण-मेढे ग्रामपंचायत कार्यालयात तर भेडशी दामोदर सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा समन्वयक अॅड.नंदन वेंगुर्लेकर, दोडामार्ग वीजग्राहक संघटना अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, उपकार्यकारी अभियंता श्री.नलावडे, सिद्धेश केसरकर, नंदु टोपले, सावंतवाडी अध्यक्ष संजय लाड, तेरवण-मेढे सरपंच सौ.सोनाली गवस, हेवाळे उपसरपंच समिर देसाई, मदन राणे, संदेश राणे, दत्ताराम देसाई, सदाशिव गवस-पिकुळे, मायकल लोबो, दिनेश नाईक-उसप, तेरवण-मेढे येथे ४० तर भेडशी येथे ५२ वीजग्राहक उपस्थित होते. यावेळी अभियंता श्री.नलावडे यांनी सातत्याने मुसळधार पाऊस व वारा असल्याने विद्युत तारा व खांबांवर झाडे पडत असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. अपुरा वायरमन कर्मचारी असल्याने समस्या निर्माण होत आहे. गावपातळीवर वीजग्राहकांनी सहकार्य करावे, लाईन साफसफाई करावी असे आवाहन केले. तर १२ आॅगस्ट रोजी वाढीव वीजबीलबाबत तेरवण-मेढे येथे बिलिंग विभाग कर्मचारी येऊन अडी-अडचणी, समस्या, शंकांचे निरसन करतील असे सांगितले. यावेळी आगामी काळात सुरळीत वीज सेवेबाबत सकारात्मक चर्चा झाली.
______________________________
*संवाद मिडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*