शाहिद हवालदार नितीन परब यांच्या स्मृतिदिनानिमित्त करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन
दोडामार्ग
कळणे मधील शहीद हवालदार नितीन श्रीधर परब यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त कोरोना या जागतिक महामंदीच्या काळात काम करणाऱ्या धाडसी योध्याचा सत्कार समारंभ मंगळवारी नूतन विद्यालय कळणे या ठिकाणी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन विद्यालय कळणे या ठिकाणी आरोग्य, पोलीस, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कोविड काळात काम केलेल्या व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे, आरोग्यसेविका सुरेखा भणगे दोडामार्ग मंडळ अधिकारी राजन गवस, मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेधा दिगंबर कोकाटे, आरोग्यसेविका गायत्री गोविंद परब, दोडामार्ग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ सूर्यकांत देसाई, महिला पोलीस नाईक अनुराधा संदीप देसाई, सौ चैताली भंडलकर, आयनोडे सरगवे गावच्या सरपंचा सौ. मधुरा नंदकुमार नाईक यांची निवड या सत्कारासाठी करण्यात आली आहे.
संस्था अध्यक्ष प्राध्यापक मोहनराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर, दोडामार्ग पोलीस निरीक्षक श्री घाग, संस्था सचिव गणपतराव देसाई,जि. प. सदस्य सौ संपदा देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे .यावेळी हवालदार नितीन परब यांना समर्पित केल्या जाणाऱ्या अंकाचे प्रकाशन करण्यात येणार असून यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक श्री महेंद्र देसाई यांनी केले आहे.