You are currently viewing साकेडीत हायहोल्टेजमुळे उपकरणे जळाली

साकेडीत हायहोल्टेजमुळे उपकरणे जळाली

साकेडीत हायहोल्टेजमुळे उपकरणे जळाली

*कणकवली*

तालुक्यातील साकेडी- माईणकरवाडीकजिकच्या मंगळवारी भागात दुपारी अचानक वाढलेल्या होल्टेजमुळे अनेकांची विद्युत उपकरणे जळून गेली. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. दरम्यान, जळून गेलेल्या उपकरणांची भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. साकेडीच्या सदरच्या भागात मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक होल्टेज वाढले. त्यामुळे चालू स्थितीत असलेली अनेक उपकरणे जळाली. यात टीव्ही, फ्रिज, चार्जर व इतर उपकरणांचा समावेश आहे. त्यानंतर महावितरणला कळविण्यात आले असता त्यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केला. मात्र, ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगण्यात आले. सदरच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरही नवीन बसविण्यात येणार आहे. दरम्यान, नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा