You are currently viewing मालवणात रोटरी क्लबतर्फे शालेयस्तरीय समरगीत स्पर्धेचे आयोजन…

मालवणात रोटरी क्लबतर्फे शालेयस्तरीय समरगीत स्पर्धेचे आयोजन…

मालवणात रोटरी क्लबतर्फे शालेयस्तरीय समरगीत स्पर्धेचे आयोजन…

मालवण

रोटरी क्लब मालवण तर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वा. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे शालेय स्तरीय समरगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा प्राथमिक गट – इयत्ता पहिली ते चौथी आणि माध्यमिक गट- इयत्ता पाचवी ते दहावी अशा दोन गटात होणार आहे. या स्पर्धेत वीरपुरुष, देश, स्वातंत्र्य, आणि क्रांतीवीरांशी निगडित गीत सादर करावायचे आहे. एका शालेय संघात वादकांसहित जास्तीत जास्त १२ जण सहभागी होऊ शकतात. इच्छुक शाळांच्या संघांनी दि. ९ ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करावी. प्राथमिक गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रू. ११००, ८०० व ६०० तर माध्यमिक गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रू. १६००, ११०० व ८०० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच दोन्ही गटातील प्रथम विजेत्या संघास लिमये हॉस्पिटल पुरस्कृत चषक प्रदान करण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ०२३६५- २५२२६६ किंवा ९४२२०७६८०५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा