You are currently viewing वडाचापाट येथील विकासकामांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ

वडाचापाट येथील विकासकामांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ

ग्रामस्थांनी मानले आ.वैभव नाईक यांचे आभार

मालवण

मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील मंजूर विकास कामांचा शुभारंभ कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आला. वडाचापाट गावातील विकासकामांना निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांचे आभार मानले.

वडाचापाट ग्रा. पं. मार्फत गावातील प्रलंबित विकास कामे मार्गी लागण्यासाठी आ. वैभव नाईक यांच्याकडे मागणी करण्यात आली होती.यामध्ये वडाचापाट बौद्धवाडी – पाटकरवाडी – कूळकरवाडी ते लिलाकाप येथे जाणारा रस्ता ( निधी रु. ५ लाख ), वडाचापाट नवपाटवाडी क्षेत्रफळ रास्ता (रु. ५ लाख ), ‘क’ वर्ग पर्यटन मधून वडाचापाट शांतादुर्गा मंदिर परिसर सुशोभीकरण ( रु. ५ लाख ), तर गणेश कोंड ते काजू फॅक्टरी मसदे – वडाचापाट रस्ता ( रु. ५ लाख ), वडाचापाट स्मशानभूमी बांधणे ( रु. ५ लाख ) ही कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी पोईप जि. प. विभागप्रमुख विजय पालव,उद्योजक सुरेश नेरुरकर, वडाचापाट उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर, ग्रा.प.सदस्य अनंत पाटकर, अरुण पाटकर,भाऊ चव्हाण, नाना नेरुरकर, पराग नार्वेकर, कमलेश प्रभू, सुरेश नेरुरकर, बंडू वाडकर, पो. पा. विजय पालव, गणेश तावडे, राजकुमार हडकर, महिला शाखाप्रमुख सौ. पाटकर, उत्तम पालव, राकेश पालव, विनायक पालव, दीपक कासले, प्रथमेश नारिंगरेकर, सतीश राठोड, रुपेश पालव, बळी पालव, किरण प्रभू, आनंद चिरमुले, प्रभाकर पालव,हर्षल वर्दम, जयवंत पांजरी, दीपक मसदेकर, सतीश राठोड, समीर परब, मोहन घाडीगांवकर, चंद्रकांत मिठाबावकर आदिंसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा