You are currently viewing सावंतवाडीत ट्रान्सपोर्ट व्यावसाय करणार्‍या परप्रांतीयांच्या मुकादमांच्या विरोधात आज टेम्पो चालक मालक आक्रमक

सावंतवाडीत ट्रान्सपोर्ट व्यावसाय करणार्‍या परप्रांतीयांच्या मुकादमांच्या विरोधात आज टेम्पो चालक मालक आक्रमक

सावंतवाडीत ट्रान्सपोर्ट व्यावसाय करणार्‍या परप्रांतीयांच्या मुकादमांच्या विरोधात आज टेम्पो चालक मालक आक्रमक

सावंतवाडी

बाहेरून येवून या ठिकाणी ट्रान्सपोर्ट व्यावसाय करणार्‍या परप्रांतीयांच्या मुकादमांच्या विरोधात आज सावंतवाडी येथील टेम्पो चालक मालकांनी आक्रमक झाले. आमच्या पोटावर येणार्‍या संबंधित मुकादमांनी तात्काळ ट्रान्सपोर्ट वाहतूक बंद करावी, अन्यथा उद्या पासून त्यांच्या गाड्या रोखू. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी तेच जबाबदार असतील, असा इशारा आज येथे देण्यात आला आहे. दरम्यान संबंधित परप्रांतीय मुकादम आपल्या दोन-तीन गाड्या घेवून या ठिकाणी असलेल्या स्थानिक लोकांचा रोजगार हिरावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे याकडे सर्वपक्षीयांनी योग्य ती भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत संघटनेचे पदाधिकारी विशाल सावंत यांनी सांगितले.
शहरात बाहेरुन येवून स्थिरावलेल्या परप्रांतीय मुकादमांनी आपल्या दोन-तीन गाड्या खरेदी केल्या असून ट्रान्सपोर्ट व्यावसाय सुरू केला आहे. तब्बल ४० ते ४५ गाड्या परप्रांतीयांच्या असल्याने दिडशेहून अधिक स्थानिक व्यावसायिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज येथील राजवाडा परिसरात संबंधित टेम्पो चालक मालकांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत काही झाले तरी कोलगाव ते माजगाव पर्यत बाहेरुन येणार्‍या मुकादमांच्या गाड्यांना व्यावसाय करायला देणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. तसेच विरोध करुन सुध्दा कोणी व्यावसाय करीत असेल तर त्याला ठामपणे विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची भूमिका संघटनेचे पदाधिकारी विशाल सावंत यांनी मांडली.
त्यांच्या म्हणण्यानुसार आमचा तुमच्या व्यवसायाला कोणता विरोध नाही, परंतु ट्रान्सपोर्ट साठी आमच्या गाड्या वगळून तुमच्या गाड्या वापरल्यास आमचा तीव्र विरोध राहणार आहे, असे ते म्हणाले. मात्र वाळू, खडी तसेच अन्य ट्रान्सपोर्टसाठी गाड्या वापरल्या गेल्यास आम्ही त्यांना तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
यावेळी राजीव वाळके, सतिश नार्वेकर, आनंद मिशाळ, मिथिल सुभेदार, राजु गोवेकर, कादर बेग, आनंद वेरेकर, निलेश पेडणेकर, महेश गावडे, धाकू शेळके, जमीर शेख, महेश सबनीस, गणेश वेंगुर्लेकर, मुबिन बेग, कृष्णा राऊळ, प्रविण सावंत, विठ्ठल गुरव, विनोद राऊळ, गणपत टिळवे, रॉबर्ट फर्नांडिस, विजय धुरी, अभिजीत भोगण, राजन ठाकुर, शशिकांत धुरी, रविंद्र राऊळ, राहुल वरक, उमेश डाफळे, रफिक बेग, योगेश वरक, सागर परब आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा