You are currently viewing दान

दान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री भारती वाघमारे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दान*

 

दान करावे असे

ना कधी कुणा कळावे .

अपेक्षा नसावी कोणती

पुण्य पदरी पडावे.

 

भुकेलेल्याना देऊन अन्न

आत्मा शांत करावा .

न होऊन लाचार

लोभ मनी न धरावा.

 

ज्ञानात घालून भर

ज्ञानदान करावे .

भरकटलेल्या विदुराला

सन्मार्गी लावावे .

 

नाशिवंत देहाचा

अंत हा होणार.

अवयव दान करुनी

अपंगांना मिळेल अधार.

 

अनाथांचा नाथ होऊन

आधार त्यांचा व्हावा .

हरवलेल्या उमेदीला

पुन्हा जन्म द्यावा .

 

सौ भारती वसंत वाघमारे

मंचर

तालुका आंबेगाव

जिल्हा पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा