*ज्येष्ठ कवयित्री कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
बळीराजा
अवनीच्या गर्भातून
बीज आले अंकारुन
नवा गंध नवा सुगंध
आली अवनी घेऊन
नवा जीव नवी आशा
पावसाच्या वर्षावात
उगवला नवा सूर
चैतन्याच्या कोंदणात
येता मातीतून गंध
चोहीकडे दरवळ
उधळली निसर्गाने
जणू प्रेमाची ओंजळ
वर नभांगण अन्
खाली असते धरती
ओढ लागे पावसाची
देते बळीराजा स्फूर्ती
बळीराजा सुखावला
बीज जेव्हा अंकुरले
त्याच्या जीवनी पिकाचे
शुष्क मन पाणावले
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक