You are currently viewing बांद्यात संत सोहिरा मठात श्रीगुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..

बांद्यात संत सोहिरा मठात श्रीगुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..

बांद्यात संत सोहिरा मठात श्रीगुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..*

बांदा

बांदा येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये मठात रविवारी गुरुपौर्णिमा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी नाथांची नित्य पुजाअर्चा,सकाळी १० वाजता नाथांच्या पादुकांवर अभिषेक,११ वाजता संत सोहिरा चरित्रामृताचे वाचन करण्यात आले.सायंकाळी वाजतगाजत नाथांचा मठाभोवती पालखी प्रदक्षिणा सोहळा झाली.भाविक सेवेकऱ्यांनी नामाचा गजर करत यात सहभाग घेतला.त्यानंतर आरती होऊ तीर्थप्रसाद वाटण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा