🌧️ *मनाला भावलेला कविता संग्रह : एक रात्र पावसाची* 🌧️
मा. कवी श्री शालीग्राम वाडे सरांचा ‘एक रात्र पावसाची’ हा काव्यसंग्रह वाचला. मला आवडला त्यामुळे अभिप्राय म्हणून एका रसिक कवयित्रीच्या नात्याने लिहिण्याचा मोह आवरता आला नाही. पुस्तकाचे मुखपृष्ठ बघून कविता वाचण्यासाठी मन आपोआपच प्रेरीत होत. जे संगणकीय संकल्पनेतून प्रा. कु. रोहिणी शेकोकार मॅडम यांनी अगदी समर्पक असे या पुस्तकाला दिलेले आहे. आईला समर्पित अर्पण पत्रिका वाचून छान वाटले. ज्येष्ठ साहित्यीक प्राचार्य ना. जा. दांडगे सरांच्या प्रस्तावनेने या काव्यसंग्रहाची सुरुवात झाली. ज्यामध्ये सरांनी अत्यंत मोजक्या आणि भारदस्त शब्दात कवितांचे रोचक असे वर्णन केलेले वाचायला मिळते. ते कवी विषयी सांगतात की ” श्री शालीग्राम वाडे ग्रामीण भागातील, शाळेत शिकलेला विद्यार्थी व आज शिकविणारा शिक्षक!
कवितेत प्रगटलेल्या भावनेतून अर्धांगिनीच्या आधारे अवघड वाटेवरून प्रवास करून भवसागर तरून जाण्याची जिद्द व आत्मविश्वास असलेला प्रामाणिक माणूस वाटतो. यावरूनच कवी सरांच्या प्रामाणिक पणाची जाणीव होते. पुढे ‘माझ्या मनातलं’ सदरात कवी स्वतः विषयी माहिती देतांना काव्य निर्मिती, प्रकाशन, काव्यप्रवास याबद्दल थोडा खुलासा करतात. त्यातून त्यांचे साहित्यीक क्षेत्रातील आगमनाची माहिती मिळते. तसेच काही साहित्यीक मान्यवरांना हा संग्रह सादर केलेला दिसून येतो.
श्री शालीग्राम वाडे सरांच्या काव्यसंग्रहातील पहिली कविता म्हणजे ‘ रानी श्रावणात’ यामध्ये,
‘रानी श्रावणात पाखरे न्हातात पाण्यात
वासरीचे सूर कसे घुमती कानात’
या ओळीने ग्रामीण भागातील निसर्गाशी असलेले घट्टनाते अनुभवास येते. पाखरे आणि वासरू हे ग्रामीण भागातील निसर्गातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत आणि ते पहिल्याच ओळीत आल्याने कविता वाचताना मन अगदी गावाकडे जावून प्रसन्न होते.
“प्रित तुझी माझी, मेघ, मी पाहुनी तुला, हसरी तरणी, नको दूर जावू, तुटले बंध गाठीचे, पैजने वाजवीत आली, रंग रंगूनिया गेलो” अशा कवितेमध्ये प्रेम, प्रेयसी, प्रियकर यांचे प्रेमळ नाते, त्यातील भावनिक स्पर्श, एकमेकांचा आदर, मनातील घालमेल या सर्व गोष्टींना अत्यंत प्रेमळ अशा काव्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
जीवनाविषयी कवी सर अगदी तटस्थ पद्धतीने सत्य विचार करतात. त्यासाठी जीवन, दुखाश्रूचे सागर, जीवनाचा फास, आटले माणुसकीचे तळे, आयुष्य झाले माझे उणे, वाटा, इत्यादी कवितांच्या माध्यमातून जीवनातील सुखदुःखाच्या आठवणी, जीवनापासून मिळालेले अनुभव, शिकवण यांची माहिती ते देत आहेत. त्यांच्या “आयुष्य झाले माझे उणे ” या कवितेतील काही ओळी,
“मी थांबलो कुठे सरी,
नाही गवसली वाट
माझ्याच अर्धांगिनीने जीवनभर दिली मला साथ
यश आलेय तुझ्या शब्दाला तर गगन करेल ठेंगणे
संपवून ह्याच कवितेचा खेळ, आयुष्य झाले माझे उणे ”
जीवनात आलेल्या अनुभवांचे हृदयस्पर्शी असे काव्यलेखन वाचताना रसिकांचे मन भरून आल्याशिवाय राहणार नाही.
भारतपूत्र, माणुसकीचे दान, देश हा माझा गांधीचा, स्वातंत्र्याचे गीत गातो, शांतीचा तिलक, पवित्र माझा भारत देश, मोठं शून्य, या कवितांमध्ये कवी सरांचे राष्ट्रप्रेम प्रत्ययास येते. “स्वातंत्र्याचे गीत गातो” या कवितेमध्ये,
“स्मृती ठेवुनी तुझीच सेवा
लागुनी मजला उपकारी जीवा
मनी प्रतिज्ञा, घेऊनी रे
मागतो आशिर्वाद मी तुजला रे”
अशा ओळींतून देशसेवा करण्यासाठी आशिर्वाद मागताना कवी दिसतात.
पोळ्याचा ठोंबरा, हट रे बैला, बैल शुभ्र झुलीचे या कवितांमधून देशातील आर्थिक स्थितीशी असलेल्या मानवाच्या नात्यांचं एक वेगळे रूप दाखविले आहे. तसेच यामधून काही राजकीय, सामाजिक बाबींवर लक्ष वेधण्याचे कार्य कवितेद्वारे केलेले दिसते त्यातील “बैल शुभ्र झुलीचे” यामधील काही ओळी पुढीलप्रमाणे आहेत
“कशाला सजवता मालक
आज दिन नसे पोळ्याचा
घटले मूल्य रुपयाचे हे
देश हा झाला महागाईचा”.
तसेच “आई” या कवितेमध्ये तर आईचे प्रेम, आईचा महिमा वर्णन करताना कवी म्हणतात,
“आई सारे आयुष्य
दिसे नभी धनुष्य
आईविना गुरू नाही
मिच तिचा शिष्य”
मा. कवी श्री शालीग्राम वाडे सरांच्या कवितासंग्रहातील शेवटची कविता म्हणजेच “अचानक वसंताला” यामध्ये कवी सर स्त्री च्या प्रतिमेची तुलना निसर्गातील काही प्रतिमांच्या साह्याने त्यांच्या दृष्टीकोनातून स्तुती करताना बघा मिळतात.
अशाप्रकारे, “एक रात्र पावसाची” हा काव्यसंग्रह प्रेम, मैत्री, समाज, पत्नीची साथ, देशप्रेम, अशा विविध विषयांमध्ये रमून एकत्र आलेल्या कवितांचा संग्रह आहे. माझ्या मते, सरांच्या कविता या थोड्या मोठ्या असल्या तरी त्यांचा सरळ भाव, त्यातील आशय, कवितेचे वळण या सर्व कवितेला नवीन रूप देवून वाचकांना आनंद देतात. मला हा कवितासंग्रह आवडला त्यासाठी थोडेफार लिहिण्याचा व कवी सरांच्या कवितेचा आशय समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. सरांच्या पुढील काव्य प्रवासास माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा.
✍️हर्षा बाबुराव खंडागळे.
मुपो. खामगाव. जिल्हा बुलढाणा.
______________________________
*संवाद मिडिया* Advt
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*