निवासस्थांनी आलेल्या साई पालखीचे दीपक केसरकरांच्या हस्ते विधीवत पुजन…
सावंतवाडी
गुरूपौणिमेच्या निमित्ताने आज शालेश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी माडखोल येथील साई मंदिरातील पालखीचे आगमन झाले. यावेळी श्री. केसरकर यांनी त्या पालखीची विधीवत पुजा केली. यावेळी सावंतवाडी शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील साई भक्तांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. श्री. केसरकर यांनी गुरूपौणिमा उत्सव आणि आपल्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ही पालखी निवासस्थांनी आणली होती. दरम्यान ही पालखी घेवून ते उद्या सकाळी आपल्या कार्यकर्त्यासमवेत माडखोल साई मंदिराच्या दिशेने चालत जाणार आहेत. यावेळी या मिरवणूकीत साई भक्त आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.