You are currently viewing वेंगुर्ला येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

*वेंगुर्ला येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

*वेताळ प्रतिष्ठान चे सलग २६ वे रक्तदान शिबीर: ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

वेंगुर्ला

*वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि एन.सी.सी. विभाग आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला* आयोजित वेताळ प्रतिष्ठान च्या सलग २६ व्या रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे रक्तपेढी सिंधुदुर्ग च्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम.बी.चौगले , वैधकीय अधिकारी डॉ.निखिल शिंदे , अधिपरीचारिका प्रांजली परब , प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.डॉ.सचिन परुळकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सिंधु रक्तमित्र वेंगुर्ला शाखा अध्यक्ष ॲलिस्टर ब्रिटो, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, यशवंत गावडे, रक्त संघटक महेश राऊळ, डॉ. पी.आर. गावडे, डॉ.के.आर. कांबळे, प्रा. जे. वाय. नाईक, रवी शिरसाट , शैलेश जामदार , राजेश पेडणेकर ,सचिन कोंडये आदी मान्यवर उपस्थित होते.
आज सिंधुदुर्ग मद्ये बहुआयामी कार्यक्रम करणारी वेताळ प्रतिष्ठान ही अग्रणी संस्था असून त्यांनी जे लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, आजपर्यंत त्यांनी २५ रक्तदान शिबिरे यशस्वी पार पाडली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो तसेच आज या सर्व संस्था रक्तदान कार्यात मोलाचे योगदान देत असू नवोदित रक्तदात्याना सामाजिक सेवेत सामावून घेत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे असे मनोगत उद्घाटक बाळू देसाई यांनी व्यक्त केले.
डॉ.शिंदे यांनी रक्तदानाचे फायदे विषद करीत रक्तदान करा असे युवकांना आवाहन केले. रक्तदान चळवळ गावागावात रुजली पाहिजे आणि प्रत्येक घराघरात रक्तदाता तयार झाले पाहिजेत यासाठी सर्वांनी मिळून काम करूया असे प्रतिपादन प्रकाश तेंडोलकर यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ एम बी चौगले यांनी वेताळ प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान च्या विविध उपक्रमांचा आढावा घेत उपक्रमांस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत ६३ दात्यांनी सहभाग नोंदविला तर प्रत्यक्ष ४५ जणांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र आणि रोप देऊन सन्मान करण्यात आला. शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेताळ प्रतिष्ठानच्या सागर सावंत, माधव तुळसकर, सुनील आळवे,सद्गुरू सावंत, मंगेश सावंत,नाना राऊळ, प्रदीप परुळकर,प्रसाद भणगे,विधी नाईक,जान्हवी सावंत, हेमलता राऊळ,सचिन गावडे,सुहास सावंत,चेतन परब यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर व आभार सानिया वराडकर यांनी मानले.

______________________________

*संवाद मीडिया*

*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*

_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._

*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड  – 11164

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
        उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…

*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*

*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚

♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*

*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*

*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*

*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*

*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*

🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)

🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर

🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड

🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.

🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.

🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.

🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.

🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.

🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.

🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.

🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.

🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत

*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*

🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*

🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*

🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा