आंबोली आरोग्य केंद्रात सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नवा “इन्व्हर्टर”…
आंबोेली
इन्व्हर्टर नसल्याने मेणबत्तीच्या प्रकाशात प्रसूती झाल्याची दखल सावंतवाडी सामाजिक बांधिलकी या संघटनेच्या माध्यमातून तात्काळ घेण्यात आली व आज सकाळी आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नवा कोरा इन्व्हर्टर बसविण्यात आला. यासाठी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडुन त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या समाजसेवेचे कौतुक करण्यात आले.
आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात इन्व्हर्टर नसल्यामुळे काल तेथील एका महिलेची प्रसूती मेणबत्ती आणि बॅटरीच्या प्रकाशात करण्याची पाळी त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टर व अन्य सहकार्यांवर आली होती. याबाबतची माहिती तेथील ग्रामस्थांना कळाल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान याबाबतचे वृत्त काल सायंकाळी ब्रेकिंग मालवणीच्या माध्यमातून प्रसिध्द करण्यात आले होते. याची तात्काळ दखल सामाजिक संघटनेचे पदाधिकारी रवी जाधव यांनी घेतली होती. तसेच रुग्णालयाला संस्थेच्या माध्यमातून इन्व्हर्टर देण्याचे त्यांनी मान्य केले होते. त्यानुसार आज सकाळी संस्थेचे पदाधिकार्यांनी त्या ठिकाणी धाव घेवून नवा कोरा इर्न्वटर त्या ठिकाणी बसविला. तसेच त्यासाठी आवश्यक असलेली वीज जोडणी करुन घेतली. त्यांच्या या सकारात्मक उपक्रमामुळे रुग्णालय प्रशासनाकडुन त्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतिश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, शामराव हळदणकर, हेलन निब्रे, शरद पेडणेकर, अशोक पेडणेकर, प्रसाद कोदे, शेखर सुभेदार, नामदेव मुळीक, समिरा खलील, रुपा मुद्राळे, सुजय सावंत आदी उपस्थित होते. दरम्यान हा इन्व्हर्टर देण्यासाठी सानिया सर्व्हिस सेंटरचे विक्रेते संतोष तळवणेकर यांनी सहकार्य केले.
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*
*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍
*(नॅक) मानांकन प्राप्त*
*📘 आमचे कोर्सेस*
▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)
*📕 आमची वैशिष्ट्ये*
स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर
🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट
*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*
🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in
📌 *संचालक मंडळ*
🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत
*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*
*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*