You are currently viewing गुरुपौर्णिमेनिमित्त दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आज साईंची पालखी…

गुरुपौर्णिमेनिमित्त दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आज साईंची पालखी…

गुरुपौर्णिमेनिमित्त दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आज साईंची पालखी…

सावंतवाडी

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे माडखोल साई मंदिर येथील साईबाबांच्या पालखीचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे निवासस्थान श्रीधर अपार्टमेंट येथे आज सायंकाळी ५ वाजता आगमन होणार आहे.
यावेळी साई पादुकांची श्री. केसरकर यांच्या हस्ते पूजा करण्यात येणार आहे. तर उद्या सकाळी ८.३० वा. पालखी भाविकांच्या उपस्थितीत पायी दिंडीने माडखोल साई मंदिर येथे निघणार आहे. तरी सर्व साईभक्तांनी उपस्थित राहून पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा