*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री भारती वाघमारे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वारी मध्ये आले मी बाळ घेऊन तान्ह*
देवा तुझे रुप किती सुंदर गोजिरवाणं
वारीमध्ये आले मी बाळ तान्हं
रूपवान तू ,आहे किती मोठा?
जगण्याच्या तू दाखविल्या वाटा.
तुझे रुप किती सुंदर गोजिरवाणं
वारीमध्ये आले मी बाळ घेऊन तान्हं
देवा तुला भेटण्याची ओढ मला लागे .
वारकरी पुढे आणि मी मागे मागे.
देवा गोड तुझे नाम ऐकते माझे कानं
वारी मध्ये आले मी बाळ घेऊन तान्हं
देवा तुझ्या नावाचे मला लागले वेड.
तुझ्या कीर्तीला नाही जगामध्ये तोड
पाहून रूप तुझे मी विसरून जाते भान
वारीमध्ये आले मी बाळ घेऊन तान्ह.
पंढरपुरात तुझ्या नामाचा गजर
तुझी महती गातो वारकरी शायर
चंद्रभागेमध्ये मी केले आहे स्नान
वारीमध्ये आले मी बाळ घेऊन तान्ह
दर्शनासाठी तुझ्या पंढरपुरात आले
डोळे भरून पाहिले अन मन भरून गेले.
चंद्रभागे तेरी मंदिर तुझे छान
वारीमध्ये आले मी बाळ घेऊन तान्हं
सौ भारतीय वसंत वाघमारे
मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे