शिक्षक हा आपला दुसरा पालकच
शिक्षक म्हणजे शीलवंत क्षमाशील व कर्तव्यनिष्ठ यांचे सममिश्रण असणारे व्यक्तिमत्व होय.
शिक्षणाने मिटते अज्ञान
शिक्षणाने बनते व्यक्तीसज्ञान
शिक्षक हा शिक्षणाचा भोक्ता
ज्ञान देतो शिकता-शिकता !!!
ज्ञानाचे भांडार असणारा शिक्षक नि:स्वार्थपणे आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देतो. आणि त्यांना आपल्या जीवनात प्रगती करण्यासाठी सक्षम बनवतो. केवळ एका चांगल्या शिक्षकाला त्याच्या विद्यार्थ्यांच्या सवयी, स्वच्छता, इतरांशी वागणे आणि अभ्यासाकडे असलेली एकाग्रता माहित असते. शिक्षक आपला संयम कधीच गमावत नाही. आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवतो. जीवनात विजय आणि यश मिळवण्यासाठी शिक्षण ही एक मोठी शक्ती आहे. म्हणूनच देशाच्या भविष्याची आणि तरुणांच्या जीवनाची जबाबदारी शिक्षकाचा ध्यास बनते. शिक्षक लहानपणापासूनच मुलांना सामाजिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम बनवतो.
शिक्षक असतो ज्ञानाचा महासागर
शिक्षकच घडून आणतो ज्ञानाचा जागर
शिक्षक म्हणजे ज्ञानाचे भांडार
ज्ञान ज्योतीने मिटवी अज्ञानाचा अंधार
आई वडील जन्म देऊन पालन पोषण करतात, व संस्काराची शिदोरी जीवनासोबत जोडतात. तर शिक्षक नि:स्वार्थ, त्याग, समर्पण, भावनेने जीवनाला आकार देत असतात. शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देतात. शिक्षकाच्या ज्ञानाची, संस्काराची ऊर्जा, जीवनात सकारात्मक चैतन्य निर्माण करते. शिक्षकाच्या जीवनातील प्रत्येक दिन शिक्षक दिनच असतो.
आई वडील जन्म देतात, तर शिक्षक जीवन देत असतो. आई-वडील संस्काराची शिदोरी देतात, तर शिक्षक जीवनात सामर्थ्याने मार्गाक्रमण करण्यासाठी ज्ञानरूपी पंख देऊन, जीवनाला सामर्थ्य मिळवून देतो. त्याच सामर्थ्याने प्रत्येक माणूस यशाच्या शिखरावर विहार करतो. आई-वडील मुलांबाबत सपने बाळगतात, तर शिक्षक आई-वडिलांची स्वप्ने सत्यात उतरवण्याचा मार्ग दाखवतात. म्हणूनच ज्ञानाचा तिसरा डोळा देणारे शिक्षक मित्र, देव, पालकच असतात.
सुनिल करडे
जि प प्रा शाळा कोलगाव नं ४
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻🎓*
*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*
*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*
🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*
💁🏻♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇
*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*