You are currently viewing नापणे धबधबा स्वच्छता व वनभोजन कार्यक्रम संपन्न

नापणे धबधबा स्वच्छता व वनभोजन कार्यक्रम संपन्न

वैभववाडी

३ जानेवारी हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन व महिला मुक्तिदिन म्हणून साजरा केला जातो. तसेच यावर्षी पासून महिला शिक्षण दिन (पहिला) म्हणून साजरा करण्यात आला.


या “पहिल्या महिला शिक्षण दिना” च्या निमित्ताने वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेच्यावतीने वैभववाडी तालुक्याचे वैभव असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे बारमाही वाहणारा नापणे धबधबा परिसर स्वच्छता कार्यक्रम राबवून पहिला महिला शिक्षण दिन साजरा केला.
या नापणे धबधब्याला अनेक पर्यटक भेटी देतात.

धबधब्याच्या वरील बाजूला अनेक पर्यटक कुटुंबासह निसर्गाचा आनंद घेत असताना काही पर्यटक बेशिस्तपणे वागत पाणी व थंड पेयाच्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या टाकून परिसर अस्वच्छ करतात. धबधबा व येथील पर्यटकांवर कोणाचेच नियंत्रण नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून वैभववाडी महाविद्यालयातील इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी या दिनाच्या निमित्ताने स्वच्छता कार्यक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः जेवण तयार करुन वनभोजनाचा आस्वाद घेतला.
या स्वच्छता कार्यक्रमात इतिहास विभागातील सुरज पाटील, दीपक पावसकर, सागर तांबे, क्षितिज वाडेकर, प्रमोद वारीक, श्रुती धनावडे, आकांक्षा इंदुलकर, माधुरी पालकर व प्रणाली साळुंखे हे विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी व शिक्षक श्री.संदेश तुळसणकर सहभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभाग प्रमुख व माऊंटेनिअरिंग संस्थेचे सचिव प्रा.श्री.एस एन.पाटील यांनी केले होते. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.सी.एस.काकडे व संस्थेचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा