You are currently viewing ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या – ग्राहक पंचायत महाराष्ट्राची मागणी

ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या – ग्राहक पंचायत महाराष्ट्राची मागणी

ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या – ग्राहक पंचायत महाराष्ट्राची मागणी

वैभववाडी

ग्राहक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना आणि कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्याची मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने मेलव्दारे मा.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष मा. एस. पी. तावडे यांच्याकडे केली आहे.
या मेलवजा निवेदनात म्हटले आहे की, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांची स्थापना झाली आहे. या आयोगात तक्रारींची निवारण करण्यासाठी अर्ध न्यायिक यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. ग्राहक आयोगात एक बॅच कार्यरत असते. या बॅचमध्ये अध्यक्ष व दोन सदस्य यांची नियुक्ती करण्यात येते. अध्यक्ष किमान सात वर्ष वकील व्यवसाय व इतर सदस्य विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती असतात. या पॅनलला दिवाणी न्यायाधीशाचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या पॅनलला ग्राहक संरक्षण कायद्यासह सीपीसी व
सीआरपीसीसह निगडित विविध कायद्यानुसार कामकाज चालते. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगानी ग्राहकाची तक्रार तीन महिन्यात (९० दिवसात) निकाली काढली पाहिजे.
ज्या तक्रारीमध्ये तज्ञ व्यक्तीची गरज आहे, अशा तक्रारी दिडशे दिवसांमध्ये निकाली काढणे गरजेचे व अपेक्षित आहे. आयोगाला कलम ७१ नुसार हुकूमनामाचे अधिकार प्राप्त होतात.
तर कलम ७२ नुसार तीन वर्षापर्यंत शिक्षा व जास्तीत जास्त एक लाख पर्यंत दंड करण्याचे प्रावधान व अधिकार आहे. या सर्वांचा विचार करून बहुतांश व्यक्तींना प्रशिक्षण मिळाले नाही. जे काही थोडाफार व्यक्तींना प्रशिक्षण मिळाले आहे ते फक्त काही दिवसाचे व अत्यल्प आहे. जिल्हा न्यायालयातील सर्वांना जसे अधून मधून कायमस्वरूपी प्रशिक्षण सुरू असते. मात्र जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालयात तसे नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. यामुळे ग्राहक न्यायालय कामकाजात सुसूत्रता राहत नाही.
ग्राहक संरक्षण कायद्याचा मुख्य उद्देश ग्राहकांना कमी खर्चात जलद गतीने न्याय मिळावा हे आहे. त्यालाच हरताळ फासला जातो आहे. असे आम्हाला वाटते. या व्यक्तींना प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे अशा आशयाचा मेलवजा निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने पाठविण्यात आले आहे.

______________________________
*संवाद मीडिया*जाहिरात

🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*२० लाख एसयुव्ही समाधानी कुटुंब*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇

🏆सेलिब्रेशन ऑफर्स🏆
👨‍👩‍👧‍👧 *जॅायफुल जुलै* 👨‍👩‍👦‍👦

₹.1️⃣2️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣
पर्यन्त चे डिस्काउंट्स
ऑफर्स केवळ ३१ जुलै पर्यंत वैध

✅प्रीमियम आणि वैल्यू फॉर मनी

❤️ *ॲाल न्यू टाटा सफारी आणि हॅरियर*❤️

आता सर्व काही एकत्र ते देखिल
✅केवळ *१५.४९लाख* पासुन ( स्वागत मूल्य)

भारताची सर्वाधिक विकली जाणारी सुरक्षित प्रीमियम एस.यु.वी. आणि

✅ भारत एन कॅप *५ स्टार सेफ्टी* सुरक्षितता मानांकित या श्रेणी मध्ये एकमेव कार

*On the spot exchange*
💯% on road finance

🇮🇳🇮🇳*संपुर्ण स्वदेशी अभियान*🇮🇳🇮🇳

त्वरा करा.. आजच भेट दया अथवा कॅाल करा

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली | ओरस

*7377-959595*

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा