संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्न्नी मनसेच्या मागणीला यश…
प्रशासनाने बिल्डर कडून घेतले नाला पूर्ववत करण्याचे नोटराईज हमीपत्र – जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची माहिती.
कुडाळ
कुडाळमध्ये संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्न्नी मनसेच्या मागणीला आणि लढ्याला यश आलं आहे. कुडाळ नगर पंचायत प्रशासनाने बिल्डर कडून नाला पूर्ववत करण्याच नोटराईज हमीपत्र घेतलं आहे. त्यामुळे हा नाला आता पूर्ववत होणार आहे, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
धीरज परब म्हणाले, संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल येथील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे भविष्यात ड्रेनेज वॉटर व पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत सर्वप्रथम मनसेने आवाज उठवला होता. नंतर कुडाळ नगरपंचायत च्या 17 ही नगरसेवकांनी अतिक्रमण प्रश्न्नी आक्षेप घेतला होता. त्याचप्रमाणे कुडाळ शहरातील जागरूक नागरिकांनी वेळोवेळी मुख्याधिकारी यांना गैरसोई बाबत विचारणा केली होती. प्रशासन आपल्या खिशात असल्याप्रमाणे वावरणारी विकासक बिल्डर लाॅबी यांची मुजोरी, आपले कोण काही करू शकत नाही. अशी झालेली मानसिकता मोडून काढण्यासाठी मनसेने याचा सातत्याने पाठपुरावा केला.
निबंध स्पर्धा आयोजन, मुख्याधिकाऱ्यांना घेरावा, पत्रव्यवहार अशा माध्यमातून विषय लावून धरला मनसेचे नगरसेवक नाहीत, अधिकारी म्यानेज पुढे काहीच होऊ शकत नाही. असे विकासकाला बिल्डरला वाटत होते.परंतु या आंदोलना ला सुजान सुशिक्षित लोकांचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन मुख्याधिकारी यांनी संबंधित बिल्डरवर अतिक्रमण काढून टाकण्यासाठी नोटीस बजावली, यावर विकासक बिल्डर यांनी नमती बाजू घेत ओहोळ/नाला पूर्ववत करून देण्याची नोटराईज हमीपत्र नगरपंचायतला सादर केले. सोबत ओहळ नाला कसा किती रुंदी व लांबीचा करणार याचा नकाशा पण जोडला . पावसाळ्याच्या मुदतीनंतर हे काम करणार व ओहळ/ नाला रुंद केला तरच अंतिम पूर्णत्वाचा दाखला(OC)द्यावा. असेही प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे.
यावर मनसे हे आंदोलन स्थगित करत आहे. परंतु ह्या आंदोलनादरम्यान बऱ्याच कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आमच्या जवळ अनेक तक्रारी केल्या आहेत. बिल्डर नियमांना बगल देऊन कॉम्प्लेक्स बांधतात व इतर परवानगी घेतात. नंतर रहिवास्यांना सोसायटी बनवुन देऊन आपला हात बाजूला करतात. नंतर तिथे होणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. म्हणूनच आम्ही जनतेला आव्हान करतो आपल्याला बिल्डर कडून फसवणूक अथवा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा तुम्हाला न्याय देण्यासाठी 100% प्रामाणिक पणे आम्ही प्रयत्न करू.
सोसायटी झाल्यावर काही अडचणी असल्यास कायदेविषयक मार्गदर्शन तसेच आवश्यक असल्यास मोफत वकील मनसे कडून देण्यात येईल. वारंवार नागरिकांना गैरसोय आणि नियमबाह्य काम करणाऱ्या बिल्डरचा रेरा रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करू. असे धीरज परब यांनी सांगितले.
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*
*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍
*(नॅक) मानांकन प्राप्त*
*📘 आमचे कोर्सेस*
▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)
*📕 आमची वैशिष्ट्ये*
स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर
🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट
*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*
🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in
📌 *संचालक मंडळ*
🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत
*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*
*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*