You are currently viewing काव्यपुष्प – ८७

काव्यपुष्प – ८७

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्याचारितावली*

 

*काव्यपुष्प – ८७*

—————————————–

गोंदवल्यास स्थिर न राहती । सतत भ्रमंती करिती ।

गावोगावीच्या भक्तांना भेटती । श्रीमहाराज ।। १ ।।

 

सन-एकोणिसशे दहा साली । त्यांनी मुंबईची सफर केली ।

सर भालचंद्र भाटवडेकर यांच्याकडे मुक्कामी राहिली ।

महाराज, नि सोबतची मंडळी ।। २ ।।

 

चिदंबर नाईकांनीं । आणिक हुबळीच्या लोकांनी ।

करून राम मंदिराची उभारणी । बोलाविले श्री महाराजांना ।।३ ।।

श्री महाराज मुंबईहून परतले । हुबळीस निघाले। सोबती मंडळीना घेतले । श्री राम मंदिर स्थापनेसाठी ।। ४ ।।

 

जोरदार स्वागत त्यांचे झाले । खूप भक्त-लोक दर्शनास आले । भेटीने आनंदले । जन हुबळीचे ।। ५ ।।

 

एक दिवस अंगात ताप असता । कुणाला न सांगता ।

महाराज गेले भेटी करिता । भक्त जानकीबाईच्या ।। ६ ।।

 

बोले-महाराज-तब्येत बरी नाही । तोंडाला चव नाही ।

करावा सारभात तुम्ही बाई । खाईन मी ।। ७ ।।

 

राम देईल प्रेम । नामाचा ठेवा नित्य नेम । होईल सारे कुशल-क्षेम । जानकीबाई तुमचे ।। ८ ।।

*****

क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास ।।

—————————————–कवी- अरुणदास – अरुण वि.देशपांडे -पुणे

—————————————- ————

प्रतिक्रिया व्यक्त करा