३ ऑगस्टला अवयवदान दिन साजरा करणार*
कणकवली
शासनाकडून ३ ऑगस्ट हा भारतीय अवयवदान दिन व जुलै २०२४ हा महिना अवयवदान महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीसाठी निरोगी जीवनशैली आणि सुदृढतेस प्रोत्साहन देऊन अवयव प्रत्त्यारोपणाची मागणी कमी करणे, मस्तिष्क स्तंभ मृत्यू, मृत अवयवदान याबाबत जनजागृती करणे, अवयव प्रत्त्यारोपणाशी संबंधित बेकायदेशीर प्रथांचे प्रतिबंध आणि नियंत्रण करणे, अवयव दान आणि प्रत्त्यारोपणाशी संबंधित समज आणि गैरसमज दूर करणे, रुग्णालयांमध्ये मस्तिष्क स्तंभ मृत्यूच्या प्रकरणांचे आयडेंटिफिकेशन व डिक्लेरेशनमध्ये वाढ करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.