You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

सिंधुदुर्गनगरी :

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने १ जुलै २०२४ रोजी ४१ वर्ष पुर्ण करुन ४२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. बँकेने काळानुरुप आवश्यक ते बदल आत्मसात करून गेल्या ३ वर्षात डिजीटल बँक म्हणून आपली ओळख निर्माण केली. बँकेने जिल्ह्यातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास साधून सिंधुदुर्ग जिल्हा संपन्न, समृद्ध व प्रगत होण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. जिल्ह्यात कोणतेही उद्योग धंदे नसतांना देखील बँकेने रु. ५००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार करुन रु. ६००० कोटींकडे वाटचाल करत राज्यात अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून ओळख निर्माण केली आहे.

या सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. १९ जुलै २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता शरद कृषी भवन, ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेस बँकेच्या सर्व सभासद संस्था प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री.मनिष दळवी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा