You are currently viewing IFFI साठी ‘छिछोरे’ची निवड….

IFFI साठी ‘छिछोरे’ची निवड….

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाची निवड ५१व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI) झाली आहे. मात्र हे यश पाहण्यासाठी आज सुशांत आपल्यात नाही. चित्रपटात सुशांतसोबत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर त्याच्या अनुपस्थितीमुळे भावूक झाली आहे. श्रद्धाच्या करिअरमधला हा चित्रपट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या १६ ते २४ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. त्यावेळी सहकलाकारांसोबत चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी सुशांत नसल्याने श्रद्धा भावूक झाल्याचं कळतंय. या चित्रपटात शूटिंगदरम्यान श्रद्धा आणि सुशांतची चांगलीच मैत्री जमली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − fourteen =