You are currently viewing सोन्सुरे येथे बिबट्याच्या वासरावर हल्ला…

सोन्सुरे येथे बिबट्याच्या वासरावर हल्ला…

सोन्सुरे येथे बिबट्याच्या वासरावर हल्ला…

ग्रामस्थांत भितीचे वातावरणः योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी…

वेगुर्ले

आरवली सोन्सुरे येथील नाईकवाडी परिसरात गेले काही दिवस बिबट्याचा वावर आहे. काल त्या ठिकाणी त्या बिबट्याने वासरावर हल्ला केेला. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे. याबाबतची माहिती माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आबा चिपकर यांनी दिली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार गेले अनेक दिवस त्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे. काही दिवसापुर्वी तो कोंबड्यावर हल्ला करीत होता. मात्र आता त्याने वासरावर हल्ला केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा