You are currently viewing तुळशीदासजी रावराणे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा

तुळशीदासजी रावराणे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा

तुळशीदासजी रावराणे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा

कणकवली

विद्या मंदिर हायस्कूल लोरे -वाघेरी प्रशालेत संस्थाध्यक्ष तुळशीदासजी रावराणे साहेब यांचा 66 वा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व वह्या वाटप करण्यात आले व श्री देव गांगोचाळा मंदिर येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस राजनजी चिके आणि श्री. सुनील लाड उपस्थित होते तसेच श्री. अजित नाडकर्णी ,श्री. ऋतुराज तेंडोलकर सरपंच कोंडये ,लोरे-वाघेरी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी श्री. सुमन गुरव, श्री.प्रकाश रावराणे,श्री. भूपेश राणे ,श्री.मनोज रावराणे ,श्री.संतोष कदम,श्री.सुनील रावराणे,श्री. अनंत रावराणे , श्री. कृष्णा गुरव, श्री.रघुनाथ रावराणे,श्री. नरेश गुरव, श्री.अजय रावराणेसरपंच लोरे आदी मान्यवर उपस्थित होते . शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,ग्रामस्थ,पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शालेय समिती अध्यक्षश्री.मनोज रावराणे यांनी साहेबांचा वाढदिवस दरवर्षी प्रशालेमध्ये साजरा करताना प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन साजरा केला जातो या मागची भावना नेहमीच आपण समाजाप्रती असलेलं देणं या दिवसानं अधिक दृढ व्हावं हीच असते.
श्री.सुनील रावराणे यांनी आपल्या वक्तव्यातून साहेबांचा राजकीय प्रवास तसेच गावच्या विकासासाठी त्यांची असलेली तळमळ व त्यांनी केलेला गावातील विकास यांचा उहापोह केला.
प्रमुख पाहुणे सन्मा.श्री.राजनजी चिके साहेब यांनी साहेबांना शुभेच्छा देतानाच त्यांचा राजकीय व सामाजिक जीवन प्रवास उलगडून सांगितला. जिद्द ध्येय ठेवून काम केलं तर यश नक्कीच मिळतं हा आदर्श रावराणे साहेब यांच्याकडून विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री नाडकर्णी यांनी शुभेच्छा देताना दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दरवर्षी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचा मनोदय व्यक्त केला.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा देत उत्तम आरोग्य व दीर्घायु प्राप्त होवो अशा भावना व्यक्त केल्या
या शुभेच्छा स्वीकारताना सन्मा. श्री तुळशीदासजी रावराणे साहेब यांनी आपल्या आजवरच्या प्रवासातील अनेक किस्से सांगताना ध्येय डोळ्यासमोर ठेवून सतत परिश्रम घेतले तर यश निश्चितच मिळते हा आपला अनुभव आहे . विद्यार्थ्यांनी एक उत्तम नागरिक व गुणवंत विद्यार्थी होण्यास आपले ध्येय निश्चित करून तसेच प्रयत्न सातत्याने करावेत अशी भावना व्यक्त केली. आपल्या आजवरच्या प्रवासात आपले कुटुंबीय, सहकारी, ग्रामस्थ व हितचिंतक या सर्वांच्या सहकार्यानेच कार्य करण्याचं बळ, नवी ऊर्जा मिळते त्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गोसावी ए.पी.तर आभार श्री अजय रावराणे लोरे सरपंच यांनी व्यक्त केले
सर्व उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रमानंतर श्री. तुळशीदासजी रावराणे साहेब यांच्या हस्ते श्री देव गांगोचाळा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा