*तेंडोली येथे वृक्षारोपणाच्या निमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्षांचा शेतकऱ्यांशी संवाद .*
*कुडाळ:
एक झाड आईसाठी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार भाजपा किसान मोर्चा चे अध्यक्ष उमेश सावंत यांनी जिल्ह्यामध्ये १०००० वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.* *आज त्याचाच एक भाग म्हणून तेंडोली येथील ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांच्या बागेत १०० सुपारी झाडे लावण्याचा शुभारंभ जेष्ठ कार्यकर्ते राजू राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला.*
*यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस रणजित देसाई, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, शक्ति केंद्रप्रमुख मंगेश प्रभू, किसान मोर्चा सरचिटणीस गुरुनाथ पाटील, प्रमोद राऊळ, प्रताप राऊळ, उमेश राऊळ, रामचंद्र राऊळ, शशी आरोलकर, विष्णू तेंडुलकर, लवू राऊळ,अमित राणे, नारायण राऊळ, मिलिंद राऊळ, बबलू तेंडुलकर, संदीप तेंडुलकर, तेंडोली फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सचिव संदीप प्रभू, गोवेरी येथील बापू वारंग, रवींद्र कोळकर उपस्थित होते.*
*तेंडोली गावाची आत्मा अंतर्गत पारंपारिक कृषी विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय गाव करण्यासाठी निवड झाली असून गावामध्ये २० ते २५ शेतकऱ्यांचा एक गट असे १५ शेतकरी गट कार्यरत असून तेंडोली येथील ३४० शेतकरी कुटुंबे या माध्यमातून ही योजना राबवत असल्याचे तेंडोली फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सचिव संदीप प्रभू यांनी यावेळी सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या कंपनीसाठी लागणारी सर्व मदत भारतीय जनता पार्टी करेल असे आवाहन दिले.*