You are currently viewing सावंतवाडीत चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने श्री. विठ्ठल रखुमाई मंदिरात काढली दिंडी …

सावंतवाडीत चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने श्री. विठ्ठल रखुमाई मंदिरात काढली दिंडी …

सावंतवाडीत चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने श्री. विठ्ठल रखुमाई मंदिरात काढली दिंडी …

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मधील अंगणवाडी क्रमांक 15 च्या चिमुकल्याने आषाढी एकादशी निमित्ताने विठू नामाचा गजर करत तुळशी पताका घेऊन दिंडी काढली यावेळी विठुरायाची वेशभूषेत
मिहान चव्हाण तर रखुमाईच्या वेशभूषेत रिद्धीमा किटलेकर ही दिंडीमध्ये सहभागी झाली होती.

या तीन वर्षाच्या चिमुकल्यामध्ये श्री विठ्ठलाची सजलेली पालखी घेऊन पालखीचे भोई -राजवीर दळवी, शौर्य नीरतवडेकर हे बनले होते तर या विठू नामाच्या दिंडीमध्ये वारकरी चिमुकले समर्थ काष्टे, रोहित मुंज, भार्गवी मुंज, दिया पेडणेकर, प्रिशा भिसे,सावी नेवगी,प्राप्ती गवळी, काव्या गावडे, विशाखा साटेलकर, विराज लाखे, रुद्र लाखे, साईश करपे, जॉय डिसोजा, स्वराज गोरे, युवराज गावडे, प्रियांशी गुप्ता, योगिता पाटील सहभागी झाले होते
छोट्या मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठू नामाचा गजर करत ही दिंडी माठेवाडा येथून शहरातील संस्थानकालीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये दाखल झाली यावेळी विठोराया आणि रखुमाई यांच्या वेशातील मुलांनी प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि जयघोष केला.

यामध्ये मुलांचे पालक तसेच अंगणवाडी सेविका सौ अनुराधा पवार अंगणवाडी मदतनीस अमिषा सासोलकर यांच्यासह खुशी पवार गौरव बांदेकर राहील सासोलकर पालक स्वानंदी नेवगी पूजा मुंज राधिका मुंज आदी सहभागी झाले होते

प्रतिक्रिया व्यक्त करा