You are currently viewing पंढरीची वारी..

पंढरीची वारी..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

*पंढरीची वारी.*

 

अवघी दुनिया ज्याची भक्त आहे सारी,

दरवर्षी वारकरी करतात पंढरीची वारी ।।

 

या निमित्ताने गोळा करतात पुण्य,

जीवनाचे एकदम भरून जाते शून्य ।।

 

विटेवरी उभा युगे अठ्ठावीसा पासून,

प्रत्येकाकडे तो पाहतसे हासून ।।

 

गरीब आणि श्रीमंत सारे त्याचे भक्त,

भेट घ्याया विठोबाची त्यांचे उसळते रक्त ।।

 

पांडुरंगा विठ्ठला जोडते मी हात,

बोलविशी मला सदा तुझ्या वारीत ।।

 

वारीत सर्वांसवे फेर मी धरते,

विठुराया श्रद्धेने तुला प्रणाम करते ।।

 

वारीच्या वाटेत भेटतात भक्तगण,

पंढरीत येती घालीत लोटांगण ।।

 

ऊन वारा पाणी कशाची ना भीती,

तुझ्या दर्शनाचा हर्ष वाटे किती ।।

 

साऱ्या जगाचा एकटा पोशिंदा तू असे,

तुझ्या मुळे कुणालाही काही कमी नसे ।।

 

म्हणोनिया सारी कामे बाजूला सारीत,

दरसाल येती बघा भक्तगण हे वारीत ।।

 

 

 

✍🏻 *अख़्तर पठाण.*

*(नासिक रोड)*

*मो.:- 9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा