*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*
*संत दर्शन*
भेदाभेद काही उरलेच नाही
समपातळीत सगळेच राही
विषमता गेली एक स्तर झाला
क्षणात उच्चनीच भेद निमाला
एक होऊनिया वारीमध्ये चाला
टाळ मृदुंग दे आपोआप ताला
ओढ विठ्ठलाची पाऊले उचला
सार्थ दर्शनाने जीवनी मंगला
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
भागीरथी पावन लोटल्या नावा
मांदियाळी संतांची अवघी पावा
एकमेव अंतरी विठूचा धावा
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
अनिका पिकॅडिली
ए-५०३
पुनावळे ४११०३३
मो. 9890567468