You are currently viewing वेल डन मा. पालकमंत्री महोदय”…. पण ही करप्ट सिस्टीम कशी तोडणार???

वेल डन मा. पालकमंत्री महोदय”…. पण ही करप्ट सिस्टीम कशी तोडणार???

“वेल डन मा. पालकमंत्री महोदय”…. पण ही करप्ट सिस्टीम कशी तोडणार???

आज खूप दिवसानंतर एक चांगली वार्ता ऐकायली मिळाली? जिल्हा नियोजनाच्या झालेल्या वादळी सभेत मा. पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेबांनी जिल्ह्यातील विविध खात्यातील अनागोंदी कारभार, कासवाच्या गतीने चाललेलं जिल्हा प्रशासन आणि बोकाळलेला भ्रष्टाचार यावर संबंधितांची योग्य शब्दात कानउघाडणी केली. सर्वांसमक्ष झालेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यातील प्रिंट आणि सोशल मीडियावर ही बातमी झळकली. निदान या जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस ही बातमी वाचून, ऐकून क्षणभर का होईना सुखावला..
काम होत नाहीत, निधी परत जातो हा गेल्या कित्येक वर्षांचा काही अपवाद वगळता नेहमीचाचं विषय असतो.. पण दैनंदिन जीवनात आपल्या छोट्या मोठ्या कामासाठी दुर्गम ग्रामीण भागातून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्यांची जी ससेहोलपट होते त्याच काय ❓ही माणसं कुणाकडे जाणार?
मा. चव्हाण साहेबांनी कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदनही.. पण या माध्यमातून जी विकास कामं झाली त्याची गुणवत्ता काय ❓ केलेले रस्ते, बांधलेल्या मोऱ्या, बांधलेल्या शासकीय इमारती जेव्हा पहिल्या पावसात गळतात.. खचतात यावर काय करणार? यामध्ये गेली काही वर्षे एक साखळी कार्यरत आहे.. ती साखळी इतकी प्रभावी आहे सरकारं कुणाचेही येवो. त्याना काही फरक पडत नाही. एखाद्या कामामध्ये कंञाटदाराकडून टक्केवारी ही ठरलेली असते आणि या टक्केवारीत राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते सहभागी असतात. पक्षसंघटना वाढली पाहिजे यासाठी वरिष्ठ पातळीवरूनही त्याला सहजपणे मुकसंमती दिली जाते… पण हा भ्रष्टाचार सिद्ध करता येत नाही.. कारण याला पुरावा कायद्यानुसार जो पुरावा लागतो तो नसतो.
एखाद्या निवडणूकीत मग ती गावपातळीवरची असली तरी त्या गावातील हे तथाकथित कंञाटदार त्या उमेदवाराला आर्थिक रसद पुरवतात.. अर्थात त्या बदल्यात मग ती काम मिळवली जातात आणि टक्केवारीचं गणीत बिघडलं की त्याचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवर होतो आणि पहिल्या पावसातचं रस्ते वाहून जातात, मोऱ्या खचतात…
आदरणीय मंञीमहोदय ,आपण अधिकाऱ्यांच्या बाबतीत धारण केलेलं उग्र रूप अगदी योग्यचं आहे.. काही अधिकारी एवढे कोडगे असतात त्यांना ही सवयचं असते.. जास्तीत जास्त बदली होईल.. पुन्हा बदलीच्या ठिकाणी येरे माझ्या मागल्या..
अनेक घटना आहेत. एका जमीनीच्या भानगडीत एक अधिकारी अडकला होता. प्रकरण पेपरमध्ये गाजलं..त्या अधिकाऱ्याला काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवला व सहा महिन्यांत नंतर दुसऱ्या ठिकाणी चांगल्या जागेवर नियुक्ती दिली.. बरं ही नियुक्ती मंञालयीन पातळीवरचं दिली ना? याच्या विरोधात ज्या पक्षकाराने तक्रार केली होती तो पक्षकार आता हायकोर्टात गेलाय.. आणि हायकोर्टाने संबंधित महसुल यंत्रणेला नोटिसा पाठवल्यात? त्यामुळे वरपासून खालपर्यंत ही सजलेली भ्रष्ट यंत्रणा सुधारत नाही तोपर्यंत हा गढूळ प्रवाह असाचं सुरु राहाणार आणि सर्वसामान्य जनता हे सगळं अगतिकपणे बघत रहाणार.
ज्या कंञाटदाराने वेळेत काम केली नाहीत वा बोगस कामं केली त्यांना आपण काळ्या यादीत घातलतं तर तेच कंञाटदार दुसऱ्याच्या नावावर कंञाट घेतील.. याठिकाणी प्रश्न असा आहे की, काम पूर्ण झाल्यावर त्या कामाचा पूर्तता दाखला देताना अधिकारी का आपली जबाबदारी पार पाडत नाहीत.? त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा काय करते? या प्रश्र्नांची उत्तरं गांभिर्याने शोधली पाहिजेत.
कसंबसं काम करुन आपली बिलं दाखल करायची आणि पेमेंट पदरात पाडून घ्यायचं.. काम व्यवस्थित झालं नसेल आणि एखाद्या अधिकाऱ्यांनी बील अडवून ठेवलं तर एखाद्या राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे ती बील अदा होतात. हे वास्तव आहे. ते नाकारता येत नाही. ईळीमिळी गुपचिळी हा प्रकार असाचं चालणार.. तुम्ही खावा आम्ही खातो.. आम्ही मारल्यासारखं करतो तुम्ही रडल्यासारखं करा..
तरीही आपले पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आपण जाहिरपणे अधिकाऱ्यांना दिलेल्या सुपर- डुपर डोसबाबत..
..अॅड नकुल पार्सेकर..

______________________________
*संवाद मीडिया*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
https://sanwadmedia.com/140982/

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा