*सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांच्याकडून कुडाळ महिला बाल रुग्णालयासाठी २० लाखाचा सी.एस.आर.फंड*
*आमदार वैभव नाईक यांनी मानले आभार; रुग्णालयाचा घेतला आढावा*
*राज्यसरकार निधी देण्यास असमर्थ*
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ येथील जिल्हा महिला बाल रुग्णालयात भेट देऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडून रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. या रुग्णालयातील फर्निचरसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची वारंवार मागणी करून देखील महायुती सरकारने निधी मंजूर केला नाही. महिला बाल रुग्णालयाच्या पाठपुराव्यामुळे सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांनी रुग्णालयासाठी २० लाखाचा सी.एस.आर.फंड दिला आहे. त्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे आभार मानले.
या सी.एस.आर. फंडातून लवकरच फर्निचर खरेदी केले जाणार आहे. त्याचबरोबर रुग्णालयात ब्लड बँक स्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळविण्यासाठी आमदार वैभव नाईक प्रयत्न करीत आहेत. तसेच इतर आवश्यक सोयीसुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या.
यावेळी संजय पडते,अमरसेन सावंत,बबन बोभाटे, कृष्णा धुरी,संतोष शिरसाट,अतुल बंगे, अनुप नाईक,सुशील चिंदरकर,योगेश धुरी ,दीपक आंगणे, राजू गवंडे, संदीप म्हाडेश्वर,सुधीर राऊळ,स्वप्नील शिंदे, डॉ. सुशांता कुलकर्णी, डॉ. वजराटकर उपस्थित होते.