You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘आषाढी एकादशी’ हा सण मोठ्या जल्लोषात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘आषाढी एकादशी’ हा सण मोठ्या जल्लोषात साजरा

*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘आषाढी एकादशी’ हा सण मोठ्या जल्लोषात साजरा*:

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘आषाढी एकादशी’ हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. आषाढी एकादशी कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता १ ली व २ री मधील सर्व विद्यार्थ्यांनी रंगीत वेशभूषा परिधान केली. या विद्यार्थ्यांमध्ये ‘ भावेश कोठावळे’ याने विठ्ठलाचा तर ‘ मिहिरा खटावकर ‘ हिने रखुमाईचा वेश परिधान केला. वारकरी संप्रदायाची भूमिका सादर करताना विद्यार्थ्यांनी ‘ विठ्ठल – विठ्ठल ‘ असा पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करीत वारी काढली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर इयत्ता चौथी व सहावीच्या गीत समूहातील विद्यार्थ्यांनी मिळून ‘ विठू माउली तू माउली जगाची’ हे गीत सादर केले. याकरिता प्रशालेतील संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. इयत्ता दुसरी मधील कु. गंधार आटलेकर याने भक्तीने विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुरलेल्या वारकऱ्याची भूमिका सादर केली. तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून विठ्ठलाची आरती म्हटली. प्रशालेतील सहा. शिक्षिका सौ. निधी सावंत यांनी आषाढी एकादशी विषयी इंग्रजी भाषेत व सौ. चैताली वेर्लेकर यांनी मराठी भाषेत माहिती सांगितली. तसेच पंढरपूरच्या वारीत अनेक ठिकठिकाणची भक्तमंडळी एकत्र येऊन हरिनामाचा जयघोष करीत आनंदाने ही वारीची परंपरा पुढे नेतात. त्याचप्रमाणे शाळेत काढलेल्या या वारीमधून आपणही एकमेकांशी बंधुत्वाच्या, आपुलकीच्या व प्रेमाच्या नात्याने वागले पाहिजे ही शिकवण या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आली. इयत्ता १ ली ते ६ वी च्या सर्वच विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचेही सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे, उद्या असलेल्या मोहरम या सणाविषयी प्रशालेच्या सहा. शिक्षिका कु. सुझान शेख यांनी माहिती सांगितली. आषाढी एकादशी व मोहरम या दोन्ही सणांचे महत्त्व माहिती द्वारे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर व शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशाप्रकारे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये ‘ आषाढी एकादशी’ हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
https://sanwadmedia.com/140982/

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा