*प्रलंबित विकासकामांच्या पूर्ततेकरिता 15 ऑगस्ट रोजी उपोषण*
*सतत पाठपुरावा करूनही कार्यारंभ आदेश होत नसल्याने उपोषणाचा निर्णय – गुरु कल्याणकर*
बांदा:-
शहरातील मंजूर विकास कामांचा दोन वर्षे उलटूनही अंदाजपत्रक, कार्यारंभ आदेश न झाल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांनी मा.कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांना १५ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणास बसण्याची पूर्वसूचना दिली. यावेळी बोलताना कल्याणकर यांनी सांगितले की, आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.रवींद्रजी चव्हाण व आमदार श्री दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून विकासकामे मंजूर करून आणतो. परंतु सदर कामांचे अंदाजपत्रक,टेंडर प्रक्रिया तसेच कार्यारंभ आदेश वेळेत न झाल्याने सदर कामे गेली दोन वर्षे प्रलंबित आहेत. याकरिता संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करूनही अंदाजपत्रक न होणे, ईतर तांत्रिक बाबी अशा सबबी सांगून केवळ आश्वासने देण्यात येत होती. आम्ही प्रयत्न करून विकासकामे मंजूर करून आणतो व तो विकासनिधी वापर न होता परत गेल्याने आमच्या शहराला त्याचे नुकसान सोसावे लागते. सदर विकासकामे वेळेत न झाल्याने या पावसात शहरातील दोन ठिकाणी पाणी साठुन स्थानिक नागरिक व व्यापारी यांचे नुकसान झाले. त्यामुळे सर्व सोपस्कार तातडीने पूर्ण करून या विकास कामांना कार्यारंभ आदेश मिळावा, याकरिता १५ ऑगस्ट रोजी बांदा ग्रामपंचायत कार्यालयाखाली उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्याने पुन्हा आचारसंहिता लागू झाल्यास सदर १ कोटी 80 लाखांची विकासकामे ही पुन्हा प्रलंबित राहतील. तसे होऊ नये व विकास कामे वेळेत पूर्ण व्हावीत म्हणून उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यावेळी गुरु कल्याणकर यांच्यासोबत हेमंत दाभोलकर आदी उपस्थित होते.
———————————————
*संवाद मीडिया* जाहिरात
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*