You are currently viewing भारतीय नौदलात एनसीसी विद्यार्थ्यांना विशेष संधी – कमांडर सौजन्या

भारतीय नौदलात एनसीसी विद्यार्थ्यांना विशेष संधी – कमांडर सौजन्या

भारतीय नौदलात एनसीसी विद्यार्थ्यांना विशेष संधी – कमांडर सौजन्या

सावंतवाडी
58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्गच्या वतीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी ( स्वायत्त ) येथे महाकनेक्ट २०२४ रॅली अंतर्गत नौदल टीमचे जंगी स्वागत संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, संस्थेच्या चेअरमन सौ शुभदादेवी भोंसले, संस्थेचे संचालक Adv.शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. एल.भारमल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. एनसीसी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये १३ नौदल अधिकारी एकूण 150 एनसीसी कॅडेट्स आणि 3 एनसीसी ऑफिसर्स उपस्थित होते. कमांडर.अंकीश बुंदेला,कमांडर सौजन्या आणि कमांडर असिफ मुल्ला यांनी सर्व कॅडेट्सना प्रेरित केले व लेफ्टनंट कमांडर सूक्ष्म पंगोत्रा,लेफ्टनंट अच्युत कुमार आणि लेफ्टनंट कमांडर गौरव सिंग यांनी सेवेबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. भारतीय नौदळ,शाळा तांत्रिक महाविद्यालय आणि नागरी लोकसंख्येच्या विद्यार्थ्यांशी संलग्न होण्यासाठी भारतीय नौदलाच्या विविध भूमिका आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबवते. महाराष्ट्राचे उत्तर मध्ये दक्षिण भागातील किनारपट्टीच्या जिल्ह्यांसह आणि अंतराळात पोहोचण्यासाठी सोनक टोयोटा इंडियन लिमिटेड च्या संयुक्त विद्यमाने ८ जुलैपासून २५ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ३२ जिल्ह्यांचा महा कनेक्ट कार ड्राईव्ह समावेश आहे.शहरे आणि तीन रेडियल सहज सुमारे ४२१० किलोमीटर संचय अंतर प्रवास करणार. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना भारतीय नौदल सेनेच्या गौरव शाळी इतिहास व कार्याबद्दल परिचित करण्यात आले. याबरोबरच या अभियानाद्वारे एनसीसी कॅडेट्सना नौदल सेवेत कोणकोणत्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन महा कनेक्ट टीम ने दिले. तसेच पुढे कार्यक्रमात श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल.भारमल यांनी नौदलाच्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या.58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गचे RIS मेहबूब, सुभेदार नेगी , सीएचएम महेश व हवालदार राकेश बनसोडे,त्याचबरोबर सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी श्री.गिरप याप्रसंगी उपस्थित होते.एनसीसी विभाग महाविद्यालयात सदैव चांगले कार्य करत असते. यापुढेही असेच एनसीसी विभागाद्वारे चांगले सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करून एनसीसी विद्यार्थ्यांनीही त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी एनसीसीचे आर्मीचे असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ.सचिन देशमुख, नेव्हीचे असोसिएट एनसीसी ऑफिसर सब लेफ्टनंट डॉ. विशाल अपराध, एनसीसी आर्मी मुलींच्या केअर टेकर ऑफिसर सौ. कविता तळेकर यासोबत मदर क्वीन हायस्कूलचे 100 विद्यार्थी, राणी पार्वती देवी हायस्कूलचे एनसीसी चे विद्यार्थी, कळसुलकर हायस्कूलचे एनसीसी चे विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
https://sanwadmedia.com/140982/

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा