*केसरीत जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प राबवत जिल्ह्याच्या विकासाला त्यांनी दिलेली दिशा राज्याला आदर्शवत – विशाल परब*
सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी हे गाव अवघ्या काही कालावधीतच जगभरात पर्यटनाचा आकर्षण बिंदू म्हणून नावारूपाला आले आहे. येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲक्वेरियनला आज देशोदेशीचे पर्यटक भेट देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचे व्हिजनरी कार्य कसे असते, ते यामधून दिसून येत आहे. पर्यटनामध्ये विकासाची किती ताकद असू शकते हे केसरीसारख्या छोट्याशा गावात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एक्वेरियमची निर्मिती करून त्यांनी स्वानुभवातून दाखवून दिले आहे. त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटकांच्या नजरेत अनोखे कौतुक प्राप्त होत असून जिल्ह्यातील युवावर्गाला यातून मिळणारी प्रेरणा आशादायक आहे असे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी म्हटले आहे.
केसरी येथे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री इथल्या एक्वेरियममध्ये सुरू करण्यात येत असलेल्या “स्वाद केसरी” या नव्या अद्यावत रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. केसरीमध्ये रविंद्र चव्हाण यांनी सुरू केलेले ॲक्वेरियम, त्यामधील मत्स्यसंपत्ती, देशोदेशीचे विविध पक्षी, आकर्षक गार्डन यांनी समृद्ध असून अद्वितीय पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. आज पर्यटकांच्या सुविधेसाठी स्वाद केसरी रेस्टोरंटचा शुभारंभ करत पर्यटन क्षेत्रात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यासह सावंतवाडी तालुका सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, भाजपा ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दीप्ती भालेकर, माजी नगरसेविका समृद्धी विरनोडकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, अमित गवंडळकर, माजी नगरसेवक गुरु मटकर, नागेश जगताप, सुरेश नेवगी, मयूर लाखे, राजू बेग आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले आहे.