You are currently viewing मसुरेचा सुपुत्र रुपेश दुखंडे वारकऱ्यांच्या सेवेला…

मसुरेचा सुपुत्र रुपेश दुखंडे वारकऱ्यांच्या सेवेला…

लोणंद येथे वारकऱ्यांना मोफत चहा बिस्कीट पाण्याचे वाटप..

 

मसुरे :

 

सध्याच्या धावत्या जगामध्ये आपण वारीसाठी पंधरा ते वीस दिवस सर्व जण सुट्टी काढून वारीसाठी चालत जाऊ शकत नाही. पण आपण आपल्या जीवनातला एक दिवस त्या चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची काहीतरी सेवा करावी हा विचार मनामध्ये घेऊन मसुरे मागवणे गावचे सुपुत्र आणि भराडी देवी मंडळ दिवा ठाणे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री रुपेश दुखंडे आणि त्यांचे सहकारी यांनी पाऊल उचललं आणि या लोणंद गावी विठुरायाच्या वारकऱ्यांची सेवा करण्याचे निश्चित केले.

लोणंद गावी या सर्व वारकऱ्यांना मोफत चहा बिस्कीट पाणी बॉटल आणि नाश्ता देण्यात आला. तसेच या ठिकाणी या सर्व वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्यात आली. मसुरे मागवणे वाडी येथील रुपेश दूखंडे हा एक भक्त प्रतीवर्षी आपल्या संस्थेमार्फत या वारकऱ्यांसाठी हा अनोखा उपक्रम घडवून आणत असतो. रुपेश दूखंडे यांच्या या अनोख्या उपक्रमाचे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांनी कौतुक केले.

यावेळी श्री रुपेश दुखंडे कृष्णा चौगुले, संभाजी कणसे, देवेंद्र चव्हाण, अमोल दळवी, अरविंद घोगळे, महेश साटम, गिरीश ‌चिंदरकर, समीर तावडे, जयवंत गावडे, कमलेश मालवणकर, ओमकार चव्हाण, बलराज शिंदे, यज्ञेश परब, सतीश मुसळे, महाराजा मुपनर इत्यादी सहकारी उपस्थित होते. या मंडळाचे हे सर्व सहकारी सुद्धा प्रतिवर्षी रुपेश दूखंडे यांच्यासोबतच ही सेवा करत असतात. मंडळाच्या वतीने रुपेश दूखंडे यांनी सर्व वारकऱ्यांना पुढील वारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.

प्रतिक्रिया व्यक्त करा