You are currently viewing आत्माराम राऊळ यांचं कार्य सर्वांना प्रेरणादायी – अर्चना घारे परब

आत्माराम राऊळ यांचं कार्य सर्वांना प्रेरणादायी – अर्चना घारे परब

*आत्माराम राऊळ यांचे अनेकांकडून अभीष्टचिंतन..*

 

सावंतवाडी :

आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक व नेमळे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व तथा नेमळे पंचक्रोशीचे मुख्य आधारवड आत्माराम राऊळ यांचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान सर्वांना प्रेरणादायी आहे, त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो, अशी शुभेच्छा व सदिच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी व्यक्त केली.

सावंतवाडी तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी संस्थेचे चेअरमन, ज्येष्ठ मार्गदर्शक आत्माराम राऊळ यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी अभिष्टचिंतन केले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी राज्य मंत्री प्रवीण भोंसले, राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत, राष्ट्रवादीचे नेते व्हिक्टर डाँटस, प्रसाद रेगे, यांसह रुपेश राऊळ, रमण वायंगणकर, बाळू परब, अशोक दळवी अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, आत्माराम राऊळ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीकडून भरीव मदत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या या अपेक्षेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांकडून योग्य ते सहकार्य होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार क्षेत्रात नवक्रांती घडवून आणू असा विश्वास सौ. अर्चना घारे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले आत्माराम राऊळ यांनी नेमळे पंचक्रोशी संस्थेच्या माध्यमातून नेमडे पंचक्रोशीतील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची गंगा बहाल केली. आज त्यांच्यामुळेच अनेक विद्यार्थी घडले असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.

काँग्रेसचे विकास सावंत म्हणाले की आत्माराम राऊळ यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्याकडे असलेल्या दातृत्व आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे.

दरम्यान यावेळी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्री. राऊळ यांचे अभिष्टचिंतन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा