देवगड तालुक्यामध्ये मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसाने “इतक्या” लाखांचे नुकसान
विहीर कोसळली ; ठीक ठिकाणी कॉजवे व रस्ते पाण्याखाली
तळवडे न्हावणकोडं मार्गावर कोसळली दरड
देवगड :
देवगड तालुक्यात शनिवारी रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यात हाहाकार माजला असून तालुक्यात ७७ मिमी पाऊस होऊन ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.शेतजमिनी माड बागायती, कॉजवे पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले होते. तर तळवडे न्हावणकोंड धबधबा येथील मार्गावर दरड कोसळल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. अतिवृष्टीने वाहतुकीचा वेग मंदावला होता तसेच जनजीवनही विस्कळित झाले होते . तालुक्यातील सौंदाळे हेदळेवाडी येथील सत्यवान राजाराम नार्वेकर यांच्या पिण्याच्या पाण्याची विहीर कोसळून सुमारे दोन लाख रुपये तर इतर ठिकाणी असे एकूण तालुक्यात सुमारे पावणेतीन लाखापर्यंत नुकसान झाले होते.
देवगड तालुक्यात शनिवारी रात्रीपासून रविवार दुपारपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे सौंदाळे हेळदेवाडी येथील सत्यवान राजाराम नार्वेकर यांची पिण्याच्या पाण्याची विहीर कोसळली व त्यामध्ये ३ विद्युत पंप चिऱ्याखाली गेल्याने सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे.मणचे येथील महेश रामचंद्र घाडी यांच्या गोठयावर झाड पडून कौले फुडल्याने सुमारे २०,००० हजार,किंजवडेयेथील अरविंद बाळकृष्ण भोगलेयांच्या घराची पडवी कोसळून अंदाजे ३०,०००/- तर चे नुकसान झाले. जामसंडे कट्टा येथील रविंद्र भिमसेन करंगुटकर यांच्या पत्राशेडचे पत्रे उडून सुमारे ११०००/- रुपयाचे नुकसान झाले आहे.असे मिळून २ लाख ६१ हजार रुपयाचे नुकसान झाल्याची नोंद देवगड तहसील येथे करण्यात आले आहे.
वर्षा पर्यटनाचे आकर्षण असलेल्या तळवडे न्हावणकोडं येथील धबधबा ठिकाणी जाण्याच्या मार्गावर अतिवृष्टीने दरड कोसळून वाहतूक पूर्ण बंद झाली होती.तळवडे ग्रामपंचायत सरपंच रूमडे यांनी जेसीबी बोलावून दरड बाजूला करून तूर्तास्त रस्ता मोकळा केला. मात्र सुरक्षितेच्या दृष्टीने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.