सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभाग विद्यार्थिनींचे कुडाळ मान्सून मॅरेथॉनमध्ये तिहेरी यश
मालवण
स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण येथील एनसीसी विभाग विद्यार्थिनींनी कुडाळ मान्सून मॅरेथॉनमध्ये तिहेरी यश संपादन केले आहे. दहा किलोमीटर मध्ये रेश्मा पांढरे यांनी सिल्वर मेडल, तर दीक्षा झोरे यांनी ब्रांझ मेडल मिळवले. तसेच पाच किलोमीटर मध्ये क्षितिजा खरवते यांनीही ब्रांझ मेडल मिळवले आहे.
स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण या ठिकाणी एनसीसी विभागाचे कॅडेट्स कुमारी रेश्मा पांढरे, कुमारी क्षितिजा खरवते आणि कुमारी दीक्षा झोरे या तिघींनी कुडाळ मान्सून मॅरेथॉन मध्ये बाजी मारली आहे.
सिल्व्हर मेडल (द्वितीय क्रमांक) प्राप्त रेशमा पांढरे प्रथम वर्ष कला या शाखेत शिकत आहे. तर ब्रांझ मेडल (तृतीय क्रमांक) प्राप्त दीक्षा झोरे बारावी वर्गात शिकत आहे. तरपाच किलोमीटर ब्रांझ मेडल (तृतीय क्रमांक) प्राप्त क्षितिजा खरवते प्रथम वर्ष कला शाखेत शिकत आहे.
प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर,
एनसीसी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, रामभाऊ परुळेकर जुनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक, स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सर्व प्राध्यापक, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर, सेक्रेटरी गणेश कुशे यांसह संस्था पदाधिकारी व एनसीसी विभागाचे सर्व कॅडेट्स यांनी मेडल प्राप्त विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.
तिन्ही विद्यार्थिनी सातत्याने सराव करत असतात. तिन्ही एनसीसीच्या कॅडेट्स मेहनती आहेत. यापूर्वीही त्यांनी काही स्पर्धेमध्ये सहभागी होत मेडल प्राप्त केलेली आहेत. त्यांच्या मेहनतीचे हे यश आहे. असे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांनी सांगितले.
सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागांमध्ये असणारे विद्यार्थी सातत्याने यशस्वी कामगिरी करत आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेचा एनसीसीचा आलेख दिवसेंदिवस चढता ठेवण्याचे काम सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट करत असतात. अलीकडच्या काळातच हर्षदा पवार यांनी फायरिंग कॉम्पिटिशन मध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत बाजी मारली. काही विद्यार्थी आर्मीमध्ये जात आहेत. काही विद्यार्थी पोलीस भरती होत आहेत. याचा विचार करता सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये आर्ट्स, कॉमर्स, आणि सायन्स या शाखेमध्ये प्रवेश घेऊन एनसीसी मध्ये प्रवेश घ्यावा. असे आवाहनही एनसीसी विभाग प्रमुख व व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम आर खोत यांनी या निमित्ताने केलेले आहे.