मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभेत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
राजन पोकळे; रुग्णवाहिका वाटपासह भजन आणि समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन…
सावंतवाडी
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तिन्ही तालुक्यात शिवसेना व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पोकळे बोलत होते.
मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस येत्या १८ जुलै रोजी संपन्न होत आहे. यानिमित्ताने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे स्वतः परिवारासह सावंतवाडी मतदारसंघात उपस्थित राहणार असून वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यात सावंतवाडीतमध्ये युवा रक्तदाता संघटनेच्या पुढाकारातून रक्तदान शिबीर, तसेच येथील अभिनव फाऊंडेशनला रूग्णवाहिका भेट देण्यात येणार असून त्याच संचलन युवा रक्तदाता संघटना करणार आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष तथा दीपक केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली.
तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन समुह नृत्य’ स्पर्धा, ‘भजन महोत्सव’ २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. १८ जुलैपासून पुढील आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी दिली.
दरम्यान, वेंगुर्ला येथे १७ जुलैला शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व सचिन वालावलकर मित्रमंडळ आयोजित आषाढी एकादशीनिमित्त जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धा, जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा होणार आहेत. १८ जुलैला वेंगुर्ले भाजी मार्केट हनुमान मंदिरात लघुरुद्र, व्हॉलिबॉल स्पर्धा, प्राथमिक शाळांमध्ये वृक्षारोपण, वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा व वेताळ प्रतिष्ठान, तुळस या संस्थेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण आदी कार्यक्रम होणार आहेत.
मान्सून महोत्सव अंतर्गत १८ ते २० जुलैपर्यंत दशावतार नाट्यमहोत्सव होणार आहे. दोडामार्ग तालुक्यात देखील विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये मॅरोथॉन स्पर्धा, रूग्णांना फळवाटप, ताडपत्री वाटप तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, प्रथमेश प्रभू, सायली होडावडेकर, पूजा नाईक, शिवानी पाटकर, विश्वास घाग आदी मान्यवर उपस्थित होते