You are currently viewing चिपी विमानतळाला आवश्यक परवानग्या माझ्याच पाठपुराव्यामुळे : माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू

चिपी विमानतळाला आवश्यक परवानग्या माझ्याच पाठपुराव्यामुळे : माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना-भाजप पक्षाच्या नेत्यांमध्ये गेला महिनाभर सिंधुदुर्ग वाशियांना चढाओढ पहावयास मिळत आहे. आजकाल जो-तो चीपी विमानतळाच्या कामाच्या पाहणीत व्यस्त असताना दिसून येत आहे.
शनिवारी माजी केंद्रीयमंत्री व खासदार सुरेश प्रभू यांनी चिपी विमानतळाच्या विषयावर बोलतांना सांगितले की, वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तर चिपी विमानतळाला आपल्याच पाठपुराव्यामुळे आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून म्हणावा तसा पाठपुरावा झाला नव्हता, असा गौप्यस्फोट सुरेश प्रभू यांनी सावंतवाडीत केला. तसेच दि.२६ जानेवारीच्या मुहूर्तावर ७० प्रवाशांचे विमान चिपी येथे उतरण्याबाबत आपल्याला माहिती नाही. परंतु दि.३० जानेवारी पर्यंत विमानतळाचे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उडान योजनेंतर्गत या विमानतळाचा समावेश असल्यामुळे याठिकाणी कायम विमाने उडणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. एकूणच प्रभूंनी सांगितले म्हणजे लवकर विमानतळही पूर्ण होणार आणि विमानेही लवकर उडणार हे नक्की !

प्रतिक्रिया व्यक्त करा