You are currently viewing कोचरा येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध उपक्रम संपन्न….

कोचरा येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध उपक्रम संपन्न….

वेंगुर्ला

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले जन्म दिनाचे औचित्य साधून कोचरा सरपंच साची फणसेकर यांनी कोचरा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील महिला कर्मचारी डॉक्टर,आरोग्यसेविका,आशा शिक्षिका,अंगणवाडी सेविका,मदतनीस, कृषीसेविका, पोस्टमन, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सन्मानपत्र व रोपे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.या महिलांचा केलेला सन्मान हेच सावित्रीबाई फुले याच्यां जन्म दिनाचे खरे अभिवादन आहे,असे साची फणसेकर यांनी मत व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =