संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा
शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा युवानेते श्री.संदेशभाई पारकर यांचा 14 जुलै रोजी होणारा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मोठ्या उत्साहात विविध सामाजिक, कला क्रीडा, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रमांनी 12 ते 14 जुलै 2024 दरम्यान कणकवली, देवगड, वैभववाडी या तीनही तालुक्यांत साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024
देवगड तालुका:-
तालुक्यातील 10वी आणि 12वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
स्थळ:- स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसांडे
वेळ:- सकाळी 10.30 वाजता.
शनिवार दिनांक 13 जुलै 2024
वैभववाडी तालुका:-
तालुक्यातील 10वी आणि 12वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
स्थळ:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, एस टी स्टँड शेजारी
वेळ:- सकाळी 10.30 वाजता.
रविवार दि.14 जुलै 2024
कणकवली तालुका:-
स्थळ:- भगवती मंगल कार्यालय, कणकवली शहर
1) सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कै.सुबोध टिकले स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर.
2) सकाळी 10 ते 11 गुणवंत विद्यार्थी सत्कार.
3) सकाळी 11 ते 12 शंभर टक्के निकाल देणाऱ्या शिक्षण संस्थांचा सन्मान.
4) दुपारी 12 ते 1 शिवसैनिकांचा सत्कार आणि छत्री वाटप.
5) दुपारी 1 वाजता केक कापणे व शुभेच्छा वर्षाव.
या वाढदिवस सोहळ्यास शिवसेना सचिव तथा माजी खासदार श्री.विनायक राऊत, जिल्हा संपर्क श्री.अरुण दुधवडकर, आमदार श्री.वैभव नाईक, उपनेते आमदार श्री.राजन साळवी, उपनेते श्री.गौरीशंकर खोत, उपनेत्या महिला जिल्हाप्रमुख सौ.जान्हवी सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक श्री.भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अमित सामंत, विधानसभा प्रमुख श्री. सतिश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख श्री.अतुल रावराणे, आप जिल्हाध्यक्ष श्री.विवेक ताम्हणकर, युवासेना जिल्हाप्रमुख श्री.मंदार शिरसाट, महाविकास आघाडी नेते, जिल्ह्यातील प्रमुख सन्माननीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
तरी सिंधुदुर्ग जिल्हातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महविकास आघाडीच्या सर्व तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, सर्व सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि संदेश पारकर प्रेमींनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन निलम पालव, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, रुपेश नार्वेकर, मंगेश लोके, मिलिंद साटम, जयेश नर यांनी केले आहे.