पुणे / (प्रतिनिधी) :
महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे तर्फे महाकवी कालिदास जयंतीचे औचित्य साधून साहित्य, कला , संस्कृती क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या सृजन व्यक्तिमत्त्वाला २०२४ चा साहित्य साधना हा राष्ट्रीय पुरस्कार आज दिनांक ६ जुलै २०२४ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे संस्थेचे अध्यक्ष वि. ग. सातपुते यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड येथील साहित्य क्षेत्रात अनेक वर्षे योगदान करणाऱ्या, भरीव कार्य करणाऱ्या काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक तसेच साईश इन्फोटेक ॲण्ड पब्लिकेशनचे प्रकाशक व सिद्धहस्त कवी, लेखक श्री. सुनिल अशोक खंडेलवाल यांना शाल, स्मृतीचिन्ह व श्रीफळ देऊन ‘ साहित्य साधना ’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
गेली पंचवीस वर्षे मराठी, हिंदी भाषेतून रसिकांच्या मनावर आपल्या काव्यप्रतिभेचा ठसा उमटवत, साहित्याची सेवा करत तसेच नवोदितांना व्यासपीठ निर्माण करुन देत मराठी काव्यप्रतिभा चळवळ अखंडित ठेवण्यात त्यांचे विशेष योगदान आहे.
श्री. सुनिल खंडेलवाल यांना फ्री प्रेस जर्नल मुंबई व शद्ब खड्ग साप्ताहिक डोंबिवली यांच्या वतीने “साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित” करण्यात आले आहे.
कै. ग.पां. सातपुते ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने त्यांना “गजकमल कला संस्कृती* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड च्या साहित्यिक संस्थांनी याबद्दल त्यांचे समक्ष भेटून, फोनवरून अभिनंदन केले आहे.
पिंपरी चिंचवड साठी हा सन्मान आहे.