*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*🚩वारी पंढरीची 🚩*
पंढरी नगरी सजली
भक्तीमय रंग आला
आली आषाढीची वारी
जाते विठ्ठल दर्शनाला
पंढरीच्या वाटेवरी
वारकरी होती दंग
दीन दुबळ्यात दिसतो
माझा विठ्ठल पांडुरंग
टाळ विणा घेवु हाती
गळा घालु वैजयंती
नाचु गाऊ रिंगण धरु
चला जाऊ वाळवंटी
माऊलींचे अश्व रिंगण
त्यात नाचे विठु सावळा
जय हरी विट्ठल नाद
पाहू आगळा सोहळा
टाळ चिपळ्याचा नाद
चंद्रभागा खळखळली
तुकोबा पालखी दर्शन
अवघी पंढरी दुमदुमली
जाऊ काकडारतीला
पाया पडू एकमेका
मुलामांणसांत दिसे
माझा विठ्ठल नेटका
पंढरीच्या वाटेवरी
वारकरी होती दंग
दीन दुबळ्यात दिसतो
माझा विठ्ठल पांडुरंग
माझी रुख्माई माऊली
विटेवरी उभी राही
तिच्या डोळ्यांत दिसते
माझी स्वर्गातली आई
*शीला पाटील. चांदवड.*