You are currently viewing काव्यपुष्प-८५ वे

काव्यपुष्प-८५ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्री गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प-८५ वे*

————————————–

श्री महाराजांचे बोल उपदेशाचे । भक्त कल्याणाचे ।

प्रयोजन तेच पर्यटनाचे । राम नाम गोडी लावण्याचे ।।१ ।।

 

संसारी परमार्थ करावा । स्वार्थाचा लवलेश नसावा ।

शुद्ध हेतू असू द्यावा । हेची सांगणे श्रीमहाराजांचे ।। २ ।।

 

रामनाम श्रद्धेने घ्यावे । मन कार्यात गुंतवावे । परी चित्त

असू द्यावे । नामात सदा ।। ३ ।।

 

ते लबाडांचे हेतू ओळ्खती । ढोंग उघडे करिती । त्याची

लायकी दाखवुन देती । योग्य वेळी ।। ४ ।।

 

गोंदवल्यास जो जो येई । इथलाच होऊन जाई । नामाची

गोडी मनी येई । महाराजांच्या सहवासात ।। ५ ।।

 

महाराजानी जे जे सांगितले । ज्यांनी ते ऐकले । कल्याणच त्यांचे झाले । हे महत्वाचे ।। ६ ।।

 

हट्टी, दुराग्रही, संशयी येत। महाराज त्यांचे ही ऐकुनी घेत ।

परी करवून घेत । स्वतःच्या मनाजोगते ।। ७ ।।

 

कालचे आठवू नये । उद्याची काळजी करू नये । मदतीस मागे राहू नये । राम असे पाठीशी सदा ।। ८ ।।

****

करी क्रमशः लेखन हे कवी अरुणदास

—————————————–

श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-८५ वे

-अरुण वि.देशपांडे -पुणे.

—————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा