राज्यातील पत्रकारांसाठी आजपासून मुंबईत उपोषण
‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष
मुख्यमंत्री जोपर्यंत लेखी देणार नाहीत, तोपर्यंत माघार नाही
मुंबई (प्रतिनिधी)
राज्यातील वर्तमानपत्र, टीव्ही, रेडीओ, सोशल मीडिया या पत्रकारांच्या महत्वपूर्ण असलेल्या मागण्या संदर्भात ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ या देशातील सर्वाधिक पत्रकार सदस्य असलेल्या ४१ देशात पत्रकार असलेल्या संघटनेच्या वतीने आजपासून आझाद मैदानावर ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या वतीने उपोषण सुरु केले जाणार आहे. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागण्यासंदर्भात लेखी आश्वासन देणार नाहीत. तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहील, असा इशारा व्हॉईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दिला आहे.
मागण्यासाठी गेल्या आठवड्यात राज्यात ३४२ ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिस्टमंडळाला बोलावून तुम्ही आंदोलन करू नका असे आश्वाशीत केले होते, पण जोपर्यंत मुख्यमंत्री शिंदे लेखी आश्वासन देणार नाही तो पर्यंत आंदोलन असेच सुरू राहील असे ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या वतीने सांगण्यात आले होते. आंदोलनाचा दुसरा टप्पा आजपासून आझाद मैदानावर ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ आपल्या सर्व पदाधिकारी यांना घेवून उपोषणास बसणार आहेत. राज्यातील सर्व पत्रकारांचे या उपोषणाकडे लक्ष लागले आहे. सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानावर या उपोषणाला सुरूवात होईल. राज्यातून पत्रकार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ‘व्हॉईस ऑफ मिडीया’चे मुख्य संयोजक तथा कार्यध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी राज्यातील ‘व्हॉईस ऑफ मिडीया’चे सर्व पदाधिकारी, पत्रकार यांना या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवहान केले आहे.